मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर ( Megablock on Central Railway line ) रविवारी 20 मार्च 2022 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक हार्बर ( Megablock Harbor ) मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी ते गोरेगाव स्थानकादरम्यान असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी कोणताही मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान अप डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई/ वडाळा रोड स्थानकातून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यत वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणाऱ्या आणि सीएसएमटी मुंबई येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे /गोरेगाव करिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. पनवेल/ बेलापूर / वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत सीएसएमटी मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/ वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत सीएसएमटी मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. विशेष म्हणजे या ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पश्चिम रेल्वेवर मार्गावर अंधेरी ते गोरेगाव स्थानकाच्या अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. हा मेगाब्लॉक सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. याशिवाय राम मंदिर ते जोगेश्वरी स्थानकाच्या पाचव्या मार्गिकेवर सकाळी 10 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकलसेवा अंधेरी ते गोरेगाव दरम्यान धीम्या मार्गावरील वळवण्यात येतील. पश्चिम रेल्वे मार्गावर घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे काही लोकल सेवा रद्द करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
हेही वाचा - Rajvadi Kathi Holi Special : सातपुड्याच्या कुशीत रंगली राजवाडी होळी; लाखो समाज बांधवांनी घेतला सहभाग