ETV Bharat / city

रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

author img

By

Published : May 7, 2021, 6:53 PM IST

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 9 मे  2021 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Megablock
संग्रहित फोटो

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 9 मे 2021 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कसल्याही प्रकारचा ब्लॉग घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा - कोविड-१९ विरुध्दच्या 'विराट' लढाईसाठी विरुष्का सज्ज

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक-

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/ वांद्रे डाऊन-अप व डाऊन मार्गावरील रविवारी सकाळी 11.40 ते संध्याकाळी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी /बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहतील. सीएसएमटी ते वांद्रे / गोरेगाव अप आणि डाऊन लोकल सेवा ब्लॉग दरम्यान रद्द करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे प्रवाशांच्या सुविधेसाठी या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल गाड्या चालविण्यात येणार आहे. तसेच या ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्गावरून आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक-

पश्चिम रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि रेल्वे सिग्नलच्या देखभालीसाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते अंधेरी रेल्वे स्थानकाच्या अप डाऊन धीम्या मार्गावर रात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार या ब्लॉक कालावधील डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल सेवा सांताक्रुझ आणि बोरिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर अप धीम्या मार्गावरील सर्व लोकल सेवा बोरिवली आणि अंधेरी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अप जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत.

हेही वाचा - मोदी सरकारला लोकांबद्दल सहानुभूती नाही-सोनिया गांधींची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.