ETV Bharat / city

आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; रेल्वे प्रवाशांचे होणारे हाल! - mega block on three routes in mumbai

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे दिवा अप-डाऊन मार्गावर आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.

आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; रेल्वे प्रवाशांचे होणारे हाल!

author img

By

Published : Oct 3, 2021, 8:19 AM IST

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे दिवा अप-डाऊन मार्गावर आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान मुलुंडहून डाऊन दिशेकडे जाणाऱ्या लोकल सेवा दिवा स्थानकापर्यंत जलद मार्गावर धावतील. या लोकल सेवा ठाणे आणि दिव्या येथे थांबा घेतील, तर कल्याण दिशेकडे जाणाऱ्या लोकल दिवा मुलुंड दरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. या लोकल दिवा आणि ठाणे येथे थांबा घेणार आहे. म्हणून मुलुंड नंतर या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहे.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल,बेलापूर दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द केली जाणार आहे. पनवेल ते ठाणे अप आणि डाऊन मार्गावरील ट्रान्स हार्बर मार्गावरील नेरूळ ते खारकोपर अप-डाऊन लोकल सेवा बंद राहणार आहे. ब्लॉकदरम्यान बेलापूर खारकोपर दरम्यान लोकल सेवा वेळापत्रकानुसार चालवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी या ब्लॉककालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. या दरम्यान ठाणे वाशी नेरूळ स्थानकादरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असणार आहे.

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रोड सिग्नल यंत्रणेच्या दुरूस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी शनिवारी-रविवारीच्या रात्री 11.50 ते पहाटे 4.50 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा रात्रकालीन मेगाब्लॉक माहिम ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान ऑफ आणि डाऊन धीम्या मार्गावर घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत अप दिशेकडील धिम्या मार्गावरील सर्व लोकल माहीम ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ आणि महालक्ष्मी येथे या लोकल थांबणार नाही. चर्चगेट स्थानकावरून रात्री 1 वाजता बोरिवलीकडे सुटणारी गाडी चर्चगेट वरून 1 वाजून 25 मिनिटांनी सुटेल.

हेही वाचा - 'मेगाब्लॉक'मुळे बसेसमध्ये प्रवाशांची दाटी; सुरक्षित अंतराचे तीनतेरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.