ETV Bharat / city

रेल्वे रुळांची दुरुस्ती व तांत्रिक कामांसाठी तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक - mumbai local latest news

मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते भाईंदर अप आणि डाऊन धिम्या मार्गावर शनिवारी-रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

author img

By

Published : Oct 9, 2021, 3:46 PM IST

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गांवर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी १० ऑक्टोबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते भाईंदर अप आणि डाऊन धिम्या मार्गावर शनिवारी-रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ठाणे-दिवा अप आणि डाऊन धिम्या मार्गावर

मध्य रेल्वेच्या मुख्या मार्गांवरील ठाणे आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान मुलुंड येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६पर्यंत सुटणारी डाऊन धिमी/अर्धजलद सेवा मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवली जाईल व ठाणे आणि दिवा स्थानकांवर थांबेल आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचेल. कल्याण येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४१पर्यंत सुटणाऱ्या अप धिमी/अर्धजलद सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील व दिवा आणि ठाणे स्थानकांवर थांबून पुढे मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान सीएसएमटी मुंबईहून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या वेळेत पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी १०.४९ ते सायंकाळी ४.०१पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेलच्या दिशेने सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. नेरूळ येथून सकाळी १०.१५ ते दुपारी २.४५ या वेळेत खारकोपरला सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा आणि खारकोपर येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५ या वेळेत नेरूळकरिता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय ट्रेन सेवा वेळापत्रकानुसार चालतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गांवरील रेल्वे रूळ दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वॉयरचा देखभालीसाठी शनिवारी-रविवारी रात्री चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. बोरिवली ते भाईंदर अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी-रविवारच्या रात्री 12.40 ते पहाटे 4.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकवेळी अप दिशेकडील धिम्या मार्गावरील सर्व लोकल विरार/वसई रोडहून बोरीवली/गोरेगावपर्यंत जलद मार्गावर धावतील. सर्व विरार दिशेकडील डाऊन धिम्या लोकल गोरेगाव ते वसई रोड/विरार स्थानाकादरम्यान डाऊन फास्ट मार्गावर धावतील. पश्चिम रेल्वेवर रविवारी, (ता. 10) रोजी दिवसकालीन ब्लॉक नसेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.