मुंबई - शुक्रवारी झालेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी रेल्वे वाहतूक खोळंबली होती. मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने होत होती, तर बदलापूरकडे जाणारी वाहतूक रात्री उशीराने सुरू झाली. ही वाहतूक अजूनही धीम्या गतीने होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने आजचा मेगाब्लॉक रद्द केला आहे.
कल्याण ते ठाणे जलद आणि धीम्या गतीच्या वाहिन्यांवर तसेच हार्बर रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते चूनाभट्टी-बांद्रा या मार्गांवर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र, गेले दोन दिवस सुरू असलेली प्रवाशांची तारांबळ बघता आजचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक मात्र कायम ठेवण्यात आला आहे.