ETV Bharat / city

Medical waste in aarey : आरे जंगलातील आदिवासी पाड्यातील रहिवासीयांचे आरोग्य वैद्यकीय कचऱ्यामुळे धोक्यात

मुंबईतल्या आरे जंगलात (aarey forest mumbai) आदिवासी पाड्याजवळचं वैद्यकीय कचरा (medical waste in aarey) असल्याचं समोर आलं आहे. मानव आणि पर्यावरणासाठी हि बाब हानिकारक (harmful for human and environment) आहे. याबाबत नागरिक आणि डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत

Medical waste in aarey forest
मुंबईतल्या आरे जंगलात आदिवासी पाड्याजवळ वैद्यकीय कचरा, नागरिकांचं आरोग्य धोक्यात !
author img

By

Published : Sep 25, 2022, 7:21 PM IST

Updated : Sep 25, 2022, 7:34 PM IST

मुंबई: मुंबईतल्या आरे जंगलात (aarey forest mumbai) आदिवासी पाड्याजवळचं वैद्यकीय कचरा (medical waste in aarey) असल्याचं समोर आलं आहे. मानव आणि पर्यावरणासाठी हि बाब हानिकारक (harmful for human and environment) आहे. याबाबत नागरिक आणि डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या काळानंतर वैद्यकीय कचऱ्याबद्दल बऱ्यापैकी जनतेच्या मनामध्ये प्रबोधन झालेलं आहे. मात्र, आरोग्य यंत्रणेत (health department BMC) अद्यापही त्याबाबत जागरूकता दिसत नाही. आरे जंगलात 27 आदिवासी पाडे आहेत. अंदाजे 10 हजाराच्या जवळपास आदिवासी लोकसंख्या निवास करते. वनीचा पाडा महापालिका शाळेपासून चालत 500 मीटर अंतरावर आदिवासींच्या घराजवळ वैद्यकीय कचरा टाकलेला आढळला. याबाबत परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबईतल्या आरे जंगलात आदिवासी पाड्याजवळ वैद्यकीय कचरा, नागरिकांचं आरोग्य धोक्यात !

महापालिकेचे दुर्लक्ष स्थानिकांची तक्रार याबाबत आदिवासी भागातील कार्यकर्ते मोगा यांना विचारले असता, त्यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना माहिती दिली. अनेक महिने झाले. आमच्या घराजवळ हा मेडिकल कचरा आहे. तसेच हा कचरा आरे डेअरीसाठी जे छोटेखानी रुग्णालय शासनाने पूर्वी पासून बांधलेले आहे. तेथून हा कचरा येतो. त्या दवाखान्यात काही रुग्ण रोज येतात. त्यांच्यावर औषधं उपचार केल्यावर उरलेला सर्व कचरा आमच्या आदिवासी पाड्याजवळ मानवी वस्तीजवळ आणून टाकतात. कित्येकदा संबंधित डॉक्टर मंडळींना तक्रार केली. मात्र उपयोग होत नाही. इथे लहान बालके खेळतात. आमचे गुरढोर असतात. शेवटी पर्यावरणाला देखील हानी होते. समस्येवर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी देखील त्यांनी केली.

डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता आयसीएमआरचे माजी अध्यक्ष आणि डॉ.अविनाश भोंडवे (avinash bhondave) यांनी ईटीव्हीसोबत संवाद साधताना सांगितले की, भारत सरकारने फार आधी पासून जैव वैद्यकीय कचऱ्यापासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी कडक कायदा केला आहे. भारतीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (Pollution Control Board of India) दिल्ली अंतर्गत देशात या प्रकारच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ते प्रयत्न करतात.

बृहन्मुंबई महापालिकेचे कारवाईचे आश्वासन (Assurance of action by BMC) तर मुंबईतील पूर्व उपनगरे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी देखील असं काही होत असेल तर ते नियमांचे उल्लंघन आहे. तसेच आमच्याकडे या कचरा विल्हेवाटकरिता शासनाने निधी दिला आहे. मात्र, संबंधित रुग्णालयाने त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया केली की कचरा विल्हेवाट यंत्रणा उभी राहू शकते. तर महापालिका गोरेगाव पूर्व पी साउथ प्रभाग सहाय्यक आयुक्त राजेंद्र आकरे यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला असता ते म्हणाले, हे नियमाचे उल्लंघन आहे. याच्यावर तात्काळ माहिती घेवून कार्यवाही करू. इंजिनीयर आणि इतर कर्मचारी व्यक्तींना पाठवून कारवाई करण्यासंदर्भात सूचना देखील दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Sep 25, 2022, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.