ETV Bharat / city

कोरोनात दिलासादायक चित्र! राज्यातील वैद्यकीय ऑक्सिजनच्या मागणीत घट - serous corona patients in Maharashtra

सप्टेंबरमध्ये ऑक्सिजनचा विषय महत्वाचा ठरला. पण आता ऑक्टोबरमध्ये चित्र बदलले आहे. वैद्यकीय ऑक्सिजनची माणगी कमी झाली आहे. राज्यात रुग्णांची संख्या घटू लागली आहे.

ऑक्सिजन टाकी
ऑक्सिजन टाकी
author img

By

Published : Oct 21, 2020, 5:39 PM IST

मुंबई - राज्यातील गंभीर कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय ऑक्सिजनची मागणीही कमी झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. या वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची मागणी 850 टनावरून थेट 595 टनावर गेली आहे. त्यामुळे रुग्णालयामधील ऑक्सिजनचा साठा वाढल्याचे अन्न आणि औषध प्रशासनातील (एफडीए) अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी होत असताना दुसरीकडे या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला आहे. सप्टेंबरमध्ये दिवसाला वैद्यकीय वापरासाठी 850 टन ऑक्सिजन लागत होता. सध्या, ही मागणी दिवसाला 595 टनावर आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनातील (एफडीए) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

सप्टेंबरमध्ये ऑक्सिजनची वाढली होती मागणी-

मुंबईसह राज्यात मार्चपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोना हा मूळ श्वसनाचा आजार आहे. त्यामुळे साहजिकच कोरोनाचे विषाणू सर्वात आधी रुग्णांच्या फुफ्फुसावर हल्ला करतात. परिणामी रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे रुग्णांना दम लागतो. तेव्हा अशा रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन देण्याची गरज भासते. सप्टेंबरमध्ये राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. हा रुग्णांचा आकडा 10 ते 15 हजारांवरून दिवसाला 18 ते 23 हजारांवर पोहोचला. कोरोनाचे गंभीर रुग्णही वाढू लागल्याने ऑक्सिजनची गरज भासू लागली.

मुंबई-पुण्यासारख्या शहरात वैद्यकीय ऑक्सिजनची बऱ्यापैकी उपलब्धता होती. मुंबई महानगरपालिकेने तर ऑक्सिजनची उपलब्धता आधीच वाढविली होती. महत्त्वाचे म्हणजे ऑक्सिजनचे प्रकल्प मुंबई-पुण्याजवळ अर्थात रायगडमध्ये असल्याने ऑक्सिजन लवकर उपलब्ध होणे शक्य होते. मात्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये ऑक्सिजनची मोठी टंचाई निर्माण झाली. ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारला ऑक्सिजन पुरावठ्याच्या नियमावलीत बदल करावा लागला. कंपन्यांना 80 टक्के ऑक्सिजन केवळ वैद्यकीय वापरासाठी तर 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी करणे बंधनकारक करण्यात आले. एकूणच सप्टेंबरमध्ये ऑक्सिजनचा विषय महत्वाचा ठरला. पण आता ऑक्टोबरमध्ये चित्र बदलले आहे. वैद्यकीय ऑक्सिजनची माणगी कमी झाली आहे. राज्यात रुग्णांची संख्या घटू लागली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी ही कमी झाल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे.

अनेक रुग्णालयांकडे 6 दिवसांचा ऑक्सिजन साठा
सप्टेंबरमध्ये ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली होती. राज्यात अंदाजे 1200 टन ऑक्सिजनचे उत्पादन दिवसाला होत होते. त्यातील 1050 टन वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन उपलब्ध होत होते. ऑक्सिजनची कमतरता राज्यात नव्हती. पण ऑक्सिजनची वाहतूक सुरळीत नसल्याने मोठ्या अडचणी आल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. मागील महिन्यात अनेक रुग्णालयात एका दिवसाचा वैद्यकीय ऑक्सिजनचा साठा होता. सध्या, अनेक रुग्णालयांकडे 6 दिवसांचा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असल्याचा दावा एफडीए अधिकाऱ्याने केला आहे.

वैद्यकीय उपयोगासाठी 80 टक्के ऑक्सिजन राखीव ठेवण्याचा निर्णय कायम

कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी संपलेला नाही. त्यात दिवाळीसारखा सण येत आहे. त्यामुळे लोक एकमेकांच्या अधिक संपर्कात येण्याची शक्यता आहे. अशावेळी कोरोना बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपयोगासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय कायम राहील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.