ETV Bharat / city

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्गाचा धोका?, राज्य सरकारकडे एकत्रित उपाययोजनांची आकडेवारी नाही?

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्गाचा धोका आहे का याबाबत चर्चा रंगली आहे. राज्याच्या प्राप्त आकडेवारी नुसार 18 वर्षाखालील मुलांचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाण 0.07 टक्के इतके आहे.

Measures are being taken to reduce the risk of corona infection in children in the third wave
तिसऱ्या लाटेत लहानमुलांना कोरोना संसर्गाचा धोका?, राज्य सरकारकडे एकत्रित उपाययोजनांची अकडेवारी नाही?
author img

By

Published : Jun 3, 2021, 5:51 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येण्याची चिन्ह दिसत आहे. त्यातच तिसऱ्या लाटेची जोरदार चर्चा रंगली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना होईल असा तर्क बांधला जात आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मागच्या सहा महिन्यात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण फारसे दिसून आलेले नाही. मात्र, राज्यात लहान मुलांना याचा धोका होऊ नये म्हणून उपाययोजन देखील केल्या आहेत.

तिसऱ्या लाटेत लहानमुलांना कोरोना संसर्गाचा धोका?, राज्य सरकारकडे एकत्रित उपाययोजनांची अकडेवारी नाही?

'भागाकडून प्रतिसाद नाही' -

यात लहानमुलांसाठी जिल्हास्तरावर विशेष नियोजन करण्यात आले आहे, त्याचे सर्वाधिका हे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे असणार आहेत. मात्र, असे असताना राज्यात लहान मुलांसाठी एकूण किती बेड उपलब्ध आहेत?, रुग्णवाहिकेची संख्या किती आहे? याची एकत्रित संख्या राज्याच्या आरोग्यविभागाकडे उपलब्ध नसल्याचे कळते आहे. राज्यात आता ऑक्सिजनचा तुटवडा भासत नाही. मात्र, जर ऑक्सिजनची गरज भासली तर तत्काळ पूरवला जाईल असे ही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. लहान मुलांसाठी केलेल्या एकत्रित उपाययोजनेसंदर्भात महिला आणि बाल विकास विभाग तसेच आरोग्य विभागाला माहिती विचारली असता या विभागाकडून प्रतिसाद मिळाला नाही.

18 वर्षाखालील मुलांच्या कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाण -

राज्याच्या प्राप्त आकडेवारी नुसार 18 वर्षाखालील मुलांचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाण 0.07 टक्के इतके आहे. ही आकडेवारी मागच्या सहा महिन्यातील आहे. त्यातून असे निदर्शनास येत आहे की, कोरोना आजाराचे प्रमाण लहान मुलांमध्ये कमी प्रमाणात दिसून येत आहे.

'राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांचे मुलांना अधिक संसर्ग होईल असे भाकित' -

राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात भाष्य करत असताना या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होईल असे भाकित केले होते. या सूचनांची राज्याने गंभीर दखल घेत टास्क फोर्सची स्थापन देखील केली. त्याचबरोबर राज्य सरकार बालकांवरील उपचारांच्या दृष्टीने रुग्णालयस्तरावर पायाभूत सुविधा, यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करीत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

काय म्हणाले टास्क फोर्सचे प्रमुख?

तिसरीला लाट येणार की नाही, याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. मात्र, गाफिल राहणे हे काही फायद्याचे नाही. त्यामुळे राज्याचा आरोग्य विभाग कामाला लागला आहे. जर लाट आलीच तर ती थोपवण्याची तयारी सुरू आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका आहे असे का म्हटले जात आहे. आतापर्यंत 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. त्यात 18 वर्षांखालील मुलांना लसीकरणाची परवानगी मिळालेली नाही. त्यातच व्हायरस म्यूटंट होत आहे. त्यामुळे याचा संपूर्ण दबाव लहान मुलांवर येणार असल्याचे कळते आहे. मात्र, आरोग्य विभाग संपूर्णपणे या लाटेला तोंड देण्यास सज्ज असल्याचे डॉ. सुहास प्रभूंनी सांगितले.

जिल्हास्थरावर काय नियोजन असणार आहे?

1. लहानमुलांच्या आरोग्यसंदर्भात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत परिस्थिती विपरीत निर्माण झाल्यास, लहान मुलांसाठी रुग्णवाहिका राखीव ठेवण्याच्या सूचना टास्क फोर्सकडून मिळाली आहे

2. खासगी रुग्णालयात लहान मुलांसाठी राखीब बेडची व्यवस्था करण्याच्या सूचना टास्कफोर्सकडून मिळाली आहे

3. लहानमुलांच्या कोविड सेंटरची उभारणी केल्यानंतर तिथले वातावरण मुलांसाठी खेळीमेळीचे असावे. तिथल्या वार्डमध्ये कार्टून किंवा मुलांना आवडणाऱ्या कॅरेक्टरची चित्रे भिंतीला लावण्यात यावीत जेणेकरुण मुलांचे मन तिथे रमेल अश्या सूचना टास्क फोर्सकडून देण्यात आल्या आहेत.

4. कोविडसेंटरमध्ये लहान मुलांना एकटेपणा किंवा भिती वाटू नये यासाठी सोबत पालकांना राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

एकूण कोरोनाबाधीतांमध्ये कोरोना संसर्गित मुलांचे प्रमाण खालील प्रमाणे आहेस

-शून्य ते पाच सहा ते अकरा बारा ते सतरा एकूण
नोव्हेंबर 2020 ते एप्रिल 2021१.३ टक्के२.४ टक्के४.१ टक्के७.८ टक्के
नोव्हेंबर २०२०१.३ टक्के२.१ टक्के३.५ टक्के६.९
डिसेंबर २०२० १.१ टक्के१.९ टक्के ३.३ टक्के६.३ टक्के
जानेवारी २०२१ १.१ टक्के१.७ टक्के३.२ टक्के६.० टक्के
फेब्रुवारी २०२१ १.१८ टक्के२.०० टक्के४.०८ टक्के७.२६ टक्के
मार्च २०२१ १.१० टक्के२.०४ टक्के३.६४ टक्के६.७८ टक्के
एप्रिल २०२१ १.४२ टक्के२.६२ टक्के४.३४ टक्के८.३८ टक्के

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.