ETV Bharat / city

15 दिवस मुंबई बाहेरून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांवर बंदी घालण्याची गरज - महापौर - lockdown in mumbai

शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता पुढील 15 दिवस मुंबई बाहेरून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांवर बंदी घालण्याची गरज असल्याचे वक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

kishori pednekar mail express
15 दिवस मुंबई बाहेरून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांवर बंदी घालण्याची गरज - महापौर
author img

By

Published : Nov 21, 2020, 2:45 PM IST

Updated : Nov 21, 2020, 4:52 PM IST

मुंबई - दिल्ली व मुंबईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारकडून दिल्ली मुंबई विमानसेवा बंद करण्याचा विचार सुरू आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी बाहेरून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांवर बंदी घालण्याची गरज असल्याचे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे. यामुळे मुंबई आता पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जाते का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

15 दिवस मुंबई बाहेरून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांवर बंदी घालण्याची गरज - महापौर

रुग्णसंख्या वाढली

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. जुलै महिन्यात रुग्ण संख्या आटोक्यात आली होती. ऑगस्ट महिन्यातील धार्मिक सणांनंतर रुग्ण वाढू लागले. पालिकेच्या प्रयत्नाने त्यावर पुन्हा नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र दिवाळी सणादरम्यान झालेली गर्दी, राज्याबाहेरून येणारे लोक यामुळे पुन्हा मुंबईतील रुग्ण वाढले आहेत. गेल्या पाच दिवसात मुंबईतील रुग्णांची संख्या दुप्पटीहून अधिक नोंदवली गेली आहे. यामुळे मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत सुरू करता येणार नसल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.

पुढील सहा आठवडे महत्त्वाचे

मुंबईत रुग्णसंख्या वाढत असताना पालिका आयुक्तांनी पुढील सहा आठवडे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या सहा आठवड्यात थंडी वाढणार आहे. त्यामुळे रुग्ण वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ही रुग्णसंख्या आटोक्यात न आणल्यास मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो, असे ते म्हणाले.

15 दिवस मेल एक्सप्रेस बंद करा

थंडी आणि प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर जगभरात तसेच दिल्लीतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिल्ली-मुंबई विमानसेवा बंद करण्याचा विचार सुरू केला आहे. त्याचप्रमाणे मुंबईत येणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई बाहेरून येणाऱ्या मेल एक्सप्रेस ट्रेन 15 दिवस बंद कराव्या, असे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या
१६ नोव्हेंबर - ४०९
१७ नोव्हेंबर - ५४१
१८ नोव्हेंबर - ८७१
१९ नोव्हेंबर - ९२४
२० नोव्हेंबर - १०३१

Last Updated : Nov 21, 2020, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.