ETV Bharat / city

माहुल पम्पिंग स्टेशनबाबत आशिष शेलारांचे आरोप बिनबुडाचे - महापौर किशोरी पेडणेकरांचं प्रत्यूत्तर

पावसाळ्यात जेव्हा समुद्राला मोठी भरती असते त्यावेळी पडलेल्या पावसाळी पाण्यामुळे चुनाभट्टी व मुख्यतः हार्बर रेल्वेचा आसपासचा परिसर मोठ्या प्रमाणात प्रभावित होतो. यावर उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने एकंदरीत सहा ठिकाणी पावसाळी पाणी पंपिंग स्टेशन बांधली आहेत असे महापौरांनी सांगितले.

Mayor Kishori Pednekar
महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Dec 5, 2021, 6:41 AM IST

मुंबई - भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा गटनेते म्हणून काम केले असून त्यांना प्रशासकीय कामकाजाची चांगली माहिती आहे. त्यानंतरही त्यांनी वस्तुनिष्ठ माहिती समजून न घेता पत्रकार परिषदेत जे आरोप केले ते बिनबुडाचे व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येत असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहुल पंम्पींग स्टेशनबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे. याला महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. यावेळी उपमहापौर अँड. सुहास वाडकर, सभागृह नेते विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, पावसाळ्यात जेव्हा समुद्राला मोठी भरती असते त्यावेळी पडलेल्या पावसाळी पाण्यामुळे चुनाभट्टी व मुख्यतः हार्बर रेल्वेचा आसपासचा परिसर मोठ्या प्रमाणात प्रभावित होतो. यावर उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने एकंदरीत सहा ठिकाणी पावसाळी पाणी पंपिंग स्टेशन बांधली आहेत असे महापौरांनी सांगितले.

भूखंडाचा ताबा मिळालेला नाही -

ब्रिमस्टोवॅड दोन मास्टरप्लॅन मधील शिफारसीनुसार पश्चिम उपनगरांमध्ये मोगरा पंपिंग स्टेशन व पूर्व उपनगरामध्ये माहुल पंपिंग स्टेशन बांधण्याचे महानगरपालिकेने प्रस्ताविले आहे. यासाठी माहुल पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी केंद्र सरकारच्या साँल्ट कमिशनर खात्याकडे सलग दहा ते पंधरा वर्षांपासून जागा मिळविण्यासाठी १० जून २०२१ पर्यंत पत्रव्यवहाद्वारे पाठपुरावा करण्यात आला. परंतु त्याला सद्यस्थितीपर्यंतही काही उत्तर मिळाले नाही. तसेच आजतागायत सदर भूखंडाचा ताबा महापालिकेला मिळालेला नाही अशी माहिती महापौरांनी दिली.

पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी जागा आवश्यक -

मुंबईकर नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मे. एन.जे. एस. प्रायव्हेट लिमिटेड या तांत्रिक सल्लागारांनी पुन्हा सर्वेक्षण व स्थळ निरीक्षण करून इतर भूखंडावर खारफुटी असल्यामुळे व ते नैसर्गिक क्षेत्रात वसलेले असल्यामुळे माहुल पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी लागणाऱ्या पंधरा हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रासाठी मौजे आणिक मधील नगर भूमापन क्रमांक १ अ/ ११ व १ अ /१२ हा २८०८२. ७० चौरस मीटर एकूण क्षेत्रफळ असलेला भूखंड योग्य असून त्यापैकी १५ हजार ५०० चौरस मीटर जागा पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी आवश्यक असल्याचे कळविले. सदर भूखंडाची योग्यता तांत्रिक सल्लागारांनी निश्चित केली.

खर्चात बचत होईल -

सदर जागा ही अतिक्रमण मुक्त आहे. तसेच सदर जागा अंशता नाल्याच्या ५० मीटर सीआरझेड बफरने बाधित आहे. केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण खात्याच्या दिनांक १८.०१.२०२१ च्या अधिसूचनेत सीआरझेड - आयबी मध्ये अनुज्ञेय असलेल्या वापराबाबत तरतुदींमध्ये उल्लेखित आहे. सदर जागा नाल्यालगत वसलेली असल्यामुळे वेगळ्या पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या व्यवस्थेची आवश्यकता भासणार नाही व त्यामुळे प्रकल्पाचे एकूण खर्चात बचत होईल. तसेच सदर जागा पूर्व मुक्त मार्गापासून प्रवेश योग्य असल्यामुळे, भविष्यातील पाहणी व परिरक्षणाच्यादृष्टीने योग्य आहे असे महापौर म्हणाल्या.

अडचणींचे निराकरण होऊ शकेल -

पर्जन्य जलवाहिन्यांमधून गुरुत्वाकर्षणाने पावसाळी पाणी तिथपर्यंत वाहून नेण्यायोग्य "स्थलाकृतिक संरचना" असल्यामुळे सदर जागा अत्यंत योग्य आहे. सदर जागेवर पंपिंग स्टेशन बांधल्यामुळे माहुल खाडीची रुंदी ही ५६ मीटरपर्यंत वाढेल जी यापूर्वीच्या स्थळावर पंपिंग स्टेशन बांधले असता ३१ मीटर एवढी होती. सदर जागेवर पंपिंग स्टेशन बांधल्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रस्त्यालगत असलेल्या भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या अस्तित्वातील पाईपलाईन बाधित होणार नाहीत. त्यामुळे त्यांचे स्थलांतरण व त्यांना द्यावे लागणारे अधिकचे संरक्षण तसेच सदर पंपिंग स्टेशनचे काम करताना व परिरक्षण करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण होऊ शकेल. या सर्व बाबी व्यवहार्य असल्यामुळे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सर्व तपासून घेतले असल्यामुळे आमदार आशिष शेलार यांचे आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येत असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.