ETV Bharat / city

Mayor Kishori Pednekar on BJP : हत्तीच्या पिल्लाचे 'चंपा', माकडाच्या पिलाचे नाव 'चिवा' ठेवू - महापौर पेडणेकर - महापौर किशोरी पेडणेकर यांची आमदार मिहीर कोटे यांची टीका

मिहीर कोटेचा हे बिल्डर आहेत. नंतर आमदार झाले. याबाबत कोणाला आक्षेप नाही. निविदा देण्याची एक प्रक्रिया असते. केवळ दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे, कोटेचा यांनी अभ्यास करून घोटाळा काढावा. कारण नसताना आरोप करू नका, असा टोला मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी ( Mayor Kishori Pednekar on MLA Mihir Kote ) लगावला.

महापौर किशोरी पेडणेकर
महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Jan 20, 2022, 4:16 PM IST

Updated : Jan 20, 2022, 5:44 PM IST

मुंबई - हत्तीच्या पिल्लाचे चंपा आणि माकडाचे नाव चिवा ठेवू, असे म्हणत महापौर किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर ( Mayor Kishori Pednekar on Chitra Wagh ) दिले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. भाजप टीका करत आहे ना की मराठी नावं ठेवायला हवी, मग पुढच्या वेळी हत्तीच्या पिल्लाला चंपा नाव ठेऊ आणि एक माकडाचे पिल्लू येणार आहे त्याचे चिवा ठेऊ, असे सांगतानाच केवळ विरोधाला विरोध आणि खालच्या स्तरावरची टीका करणे सोडा, असा सल्लाही महापौरांनी दिला ( Mayor Kishori Pednekar on BJP ) आहे.

हत्तीच्या पिल्लाचे 'चंपा', माकडाच्या पिलाचे नाव 'चिवा' ठेवू - महापौर पेडणेकर

कोटे यांनी अभ्यास करुन घोटाळा काढावा - मिहीर कोटेचा हे बिल्डर आहेत. नंतर आमदार झाले. याबाबत कोणाला आक्षेप नाही. निविदा देण्याची एक प्रक्रिया असते. केवळ दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे, कोटेचा यांनी अभ्यास करून घोटाळा काढावा. कारण नसताना आरोप करू नका, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी ( Mayor Kishori Pednekar on MLA Mihir Kote ) लगावला.

न्यायालयानेही केले समाधान व्यक्त - न्यायालयात पालिकेने सत्य माहिती दिली आहे. मुंबईत कोरोना रुग्ण संख्या चार पटीने कमी होत आहे. आरोग्य यंत्रणेवर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) लक्ष ठेवून आहेत. कोरोनाबाबत विरोधकांचाही सल्ला घेतला जातो. मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असून यासाठी मुंबईकरांचा सिंहाचा वाटा आहे. सध्याच्या कोरोनास्थितीबाबत न्यायालयानेही समाधान व्यक्त केले आहे, असे महापौर पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar on Corona ) म्हणाल्या.

पालकांनी संमती द्यावी - बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शाखापातळीवर १५ ते १८ वयोगटांतील मुलांना लसीकरण करण्याचे कार्यक्रम घेऊ. यासाठी पालकांनी संमती द्यावी, असे आवाहन करत ज्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे आहे, त्यांनी त्याबाबत संमतीपत्र द्यावे, असेही आवाहन महापौर पेडणेकर यांनी ( Mayor Kishori Pednekar on Vaccination ) केले.

प्रचारासाठी गोव्याला जाणार - गोवा माझे मुळ गाव व सासर आहे. यामुळे निवडणुकीच्या प्रचारासाठी मी गोव्याला जाणार आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केली, अशी टीका विरोधक करत आहेत. किमान विकासाची काम करत आहोत हे विरोधात मान्य करत आहेत, असा चिमटाही महापौरांनी ( Mayor Kishori Pednekar on Goa Election ) काढला.

Last Updated : Jan 20, 2022, 5:44 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.