ETV Bharat / city

महापरिनिर्वाण दिन : चैत्यभूमीवर गर्दी करू नका, महापौरांचे आवाहन - महापरिनिर्वाण दिन विशेष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दादर चैत्यभूमी येथे २५ लाखांहून अधिक भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. १ ते ७ डिसेंबर दरम्यान दादर परिसरात पाय ठेवायला जागा नसते. लाखो लोकांची गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. यामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

चैत्यभूमीवर बातम्या
महापरिनिर्वाण दिन : चैत्यभूमीवर गर्दी करू नका, महापौरांचे आवाहन
author img

By

Published : Dec 5, 2020, 1:59 PM IST

Updated : Dec 5, 2020, 3:13 PM IST

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या (६ डिसेंबर) ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. चैत्यभूमीवर फक्त शासकीय कार्यक्रम होणार आहेत. कोविडचा काळ असल्याने कोणालाही अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांसह महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी देखील त्याला दुजोरा देत गर्दी टाळण्याचे आवाहन केले.

महापरिनिर्वाण दिन : चैत्यभूमीवर गर्दी करू नका, महापौरांचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दादर चैत्यभूमी येथे २५ लाखांहून अधिक भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. १ ते ७ डिसेंबर दरम्यान दादर परिसरात पाय ठेवायला जागा नसते. लाखो लोकांची गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. ते रोखण्यासाठी भीम अनुयायांनी सहकार्य करावे. यासाठी मुख्यमंत्री, महापौर, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.

गर्दी करू नका

कोरोना संकटामुळे यावर्षी जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन महापौरांनी केले. त्यासोबतच कोरोनामुळे अनुयायांसाठी निवास व्यवस्था करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेय चैत्यभूमी येथे दरवर्षी ज्या पद्धतीने सजावट करण्यात येते ती सजावट करण्यात आली आहे. यामध्ये चैत्यभूमी वास्तूची तसेच अशोक स्तंभ व तोरणा गेटची साफसफाई व रंगरंगोटी करणे, चैत्यभूमी व अशोक स्तंभाची फुलांनी सजावट करणे, भीमज्योतीची फुलांनी सजावट करणे, तसेच चैत्यभूमी व आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करणे व किटकनाशक औषधांची फवारणी करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. चैत्यभूमी येथील शासकीय मानवंदनेचे व अभिवादनांसाठी ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात येणार असून चैत्यभूमी येथे १ अग्निशमन इंजिन, अतिदक्षता रुग्णवाहि‍का व चार बोटी तसेच जल सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांचेही आवाहन

महापरिनिर्वाण दिन हा बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून या अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

असाल तिथून अभिवादन

अभिवादनाच्या कार्यक्रमात लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. कोविडचे संकट संपले असे मानू नये. चैत्यभूमीवर गर्दी न करता डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी करायच्या त्या सर्व केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ दिला जाणार नाही. यापूर्वीही आपण सर्व सणवार साधेपणाने साजरे केले आहे. डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण हा गांभीर्याने आणि अभिवादन करण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे या काळात आपण जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

चैत्यभूमीवर फक्त शासकीय कार्यक्रम

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही सहा डिसेंबर रोजी अनुयायांना अभिवादनासाठी मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे. या भूमिकेचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वागत केले. तसेच समितीने चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांच्या कार्यवाहीबाबत संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले. त्यानुसार महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाइन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात येणार आहे.

शिवाजी पार्कवर नागरी सुविधा नाही

यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा धोका पाहता दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. ती रोखण्यासाठी राज्य शासनासह बृहन्मुंबई महानगरपालिका देखील सतर्क व सज्ज आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना प्रदान करून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तथापि, कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वांचे पालन करता यावे, कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. या कारणाने यंदा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा अनुयायांना महापरिनिर्वाण दिनी उपलब्ध करणे शक्य होणार नसल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले.

Last Updated : Dec 5, 2020, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.