मुंबई - सध्या महाराष्ट्रात " Why i killed Gandhi? या चित्रपटाविषयी जोरदार चर्चा असून तो चित्रपट लवकरच महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात स्पष्टपणे महात्मा गांधीजींचा (Mahatma Gandhi) खुनी नथुराम गोडसे (Nathuram Godse) याच्या या पाशवी कृत्याचे समर्थन करण्यात आले आहे. यामुळे हा चित्रपट प्रदर्शित करू नये या मागणीसाठी आझाद मैदानात मौलाना आझाद विचार मंचच्यावतीने (Maulana Azad Vichar Manch agitation) निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या उपस्थितीत ही निदर्शने करण्यात आली.
गांधीजींच्या विचारांचा खून होतोय -
केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून गेले ७ वर्ष रोजचं राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या होत आहे. त्यांच्या विचारांचा रोज खून पाडला जात आहे , हे अत्यंत निषेधार्य आहे. परदेशात अमेरिका असो युरोप असो त्याठिकाणी आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी स्वतःला गांधीवादी विचारांचे आहोत असे खोटे बोलतात. भारत देश हा गांधींच्या विचाराने चाललेला आहे असेही सांगतात मात्र देशात आल्या नंतर गांधी विचारांची पायमल्ली करतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. "मुह मे राम बगल मे छुरी" अशा पद्धतीचे वर्तन देशात चालू आहे. RSS विचारांचे सरकार केंद्रात आल्यानंतर भारतात ठीक ठिकाणी गांधीजींचे हत्यारे नथुराम गोडसे याचे पुतळे उभारले गेलेत व त्याची RSS अनुयायांकडून रोज पूजा करण्यात येत आहे. मध्यंतरी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे दहन ही करण्यात आले आहे व गांधींचे फोटो लावून त्यांना गोळ्याही घातल्या जात आहेत. त्यावेळेस मात्र स्वतःला गांधीवादी विचारांचे मानणारे पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला नाही . रोज गांधीजींच्या विचारांचा खून होतो आहे, अशी टीका माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.
चित्रपट प्रदर्शित करू नये -
सध्या महाराष्ट्रात " Why i killed Gandhi? या लघुपटाविषयी जोरदार चर्चा असून तो लघुपट लवकरच महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात स्पष्टपणे महात्मा गांधीजींचा खुनी नथुराम गोडसे याच्या या पाशवी कृत्याचे समर्थन करण्यात आले आहे. देशात पाच राज्यात निवडणूक संपन्न होत असून प्रामुख्याने उत्तर प्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित करून त्यांना हिंदू धर्मियांच्या भडकवण्याचा प्रयत्न करायचा असून देशभर पुनःश्च वातावरण दूषित करायचे आहे. हे आम्हाला मान्य नाही. या लघुपटात गांधींना खल पुरुष व गोडसेला हिरो दाखवले जात आहे . राष्ट्रपिता महात्मा गांधी हा भारताचा आत्मा असून त्यांना आंतराष्ट्रीय स्तरावरहि मान्यता आहे. म्हणूनच २ ऑक्टोबर हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्त अहिंसा दिवस म्हणून सर्व जगात साजरा केला जात आहे . देशातील या जातीवादी शक्तींनी कितीही गांधीजींच्या विचारांचा खून करण्याचा प्रयत्न केला तरीही गांधींचा विचार ते नष्ट करू शकत नाहीत. या देशाला भविष्यात गांधीजींचा विचारच प्रगतीकडे व एकात्मतेकडे नेवू शकतो असा आमचा ठाम विश्वास आहे. मुंबई येथे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी व हा लघुपट प्रदर्षितच करण्यात येऊ नये या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आल्याची माहिती माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी दिली.
महात्मा गांधी खलनायक तर गोडसे हिरो!
देशात पाच राज्यात निवडणूक संपन्न होत असून प्रामुख्याने उत्तर प्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित करून त्यांना हिंदू धर्मियांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करायचा असून देशभर पुनःश्च वातावरण दूषित करायचे आहे. हे आम्हाला मान्य नाही. या चित्रपटात महात्मा गांधींना खल पुरुष व गोडसेला हिरो दाखवले जात आहे. असे सांगत राष्टपिता महात्मा गांधी हा भारताचा आत्मा असून त्यांना आंतराष्ट्रीय स्तरावरही मान्यता आहे. या देशाला भविष्यात गांधीजींचा विचारच प्रगतीकडे व एकात्मतेकडे नेवू शकतो असा आमचा ठाम विश्वास आहे. असे दलवाई म्हणाले.