ETV Bharat / city

Cm Uddhav Thackeray Statement : राज्यात तूर्तास मास्क सक्ती नाही, मात्र गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा - मुख्यमंत्री

वर्षा बंगल्यावर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड टास्क फोर्स अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. कोविड टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांची तब्बल सव्वा तास बैठक चालली. या बैठकीत राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णाची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली.

Cm Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jun 3, 2022, 5:19 PM IST

मुंबई - वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. राज्यात तूर्तास मास्कसक्ती नको, तर गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचना त्यांनी टास्क फोर्स अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

तब्बल सव्वा तास सुरु होती बैठक - मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड टास्क फोर्स अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. कोविड टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांची तब्बल सव्वा तास बैठक चालली. या बैठकीत राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णाची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहे. ज्यामध्ये सार्वजिनक ठिकाणी मास्क वापरण्याचे आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन नागरिकांना करावेत. पुढील १५ दिवस खूप महत्वाचे आहेत. या वाढत्या कोविड रुग्ण संख्येवर राज्याचे बारीक लक्ष आहे. मात्र, राज्यात तूर्तास मास्क सक्ती नसली तरी, कठोर नियमावली टाळण्यासाठी सर्वानी कोविड नियम पाळावेत अशा सूचना सुद्धा टास्क फोर्स अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत - राज्यात बुधवारी १ हजार ८१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. मागील काही दिवसात दैनंदिन कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यापूर्वी २७ फेब्रुवारीला दिवसभरात ७८२ कोरोना रुग्ण आढळून आले होते. सध्या राज्यात ४ हजार ३२ रुग्ण उपचाराधिन आहेत.

दिवसभरात ५२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ७७ लाख ३६ हजार २७५ बाधितांनी कोविडवर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०७ टक्के झाले आहे. राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०९,५१,३६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ०९.७४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८ लाख ८८ हजार १६७ झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ४६० आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत असून, ही संख्या २ हजार ९७० आहे. त्याखालोखाल ठाण्यात ४५२, पुण्यात ३५७ रुग्ण उपचाराधीन आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.