ETV Bharat / city

मराठी भाषा विषय इंटरनॅशनल शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात सक्तीचा करावा - राष्ट्रवादी

मराठी ही प्रांतभाषा, राज्यभाषा म्हणून तिचे महत्त्व आहे. त्यामुळे नोकरी धंद्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या अमराठी कुटुंबातील विद्यार्थी मराठी शिकू पाहतात, पण त्यांची सोय केलेली नसते. अनेक महविद्यालयातील प्रवेश घेण्याच्या फॉर्म्समध्ये मराठी, निम्नस्तर मराठी हे विषय दिलेले नसतात. त्यामुळे ते विद्यार्थी आज हिंदीसारख्या विषयाकडे वळतात.

मराठी भाषा विषय
author img

By

Published : Jun 3, 2019, 6:46 PM IST

मुंबई - राज्यातील शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय शिकवणे बंधनकारक आहे. तीच परंपरा इंटरनॅशनल शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत कायम ठेवावी, अशी मागणी मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आज शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अकरावी-बारावीच्या स्तरावर पूर्वी महाविद्यालयात अभ्यास विषय निवडताना विद्यार्थी मातृभाषेची निवड करत होते. इंग्रजी विषय अनिवार्य असल्याने इंग्रजीने प्रथम भाषेचे स्थान घेतले आणि मातृभाषा द्वितीय स्थानावर आल्याने विद्यार्थ्यांना विदेशी भाषांचे पर्याय उपलब्ध करून दिले गेले. महाविद्यालयांमध्ये फ्रेंच, जपानी अशा विदेशी भाषा निवडणारी मुले हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी असायची. शिक्षणाच्या क्षेत्रातल्या स्पर्धेमुळे गुणांचे महत्त्व इतके वाढले की, हाच एक मुद्दा पालकांच्या दृष्टीने महत्त्वाचा झाला. शिक्षणासंदर्भात बोलायचे झाले तर इंग्रजी शाळा, कॉन्व्हेंट्स यांचे पेव तर फुटलेले होतेच, पण भरीस भर म्हणजे इंटरनॅशनल, स्कूल यांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत गेली.

या शाळांमध्ये मराठी केवळ नावालाच! तिथे प्रस्थ विदेशी भाषेचेच! तिथला मराठीचा स्तर जेमतेमच राहिला! अशा शाळांमधील मराठी आणि महाविद्यालयीन स्तरावरची मराठी यांच्यात अंतर पडत जाते. ‘मराठी टक्का हिंदीकडे वळतो आहे’ ही चर्चा चांगलीच तापली आहे; पण ‘मराठी भाषेची निवड करणारे विद्यार्थी अकरावी-बारावीच्या स्तरावर कमी होतायेत.
माहिती तंत्रज्ञानासमोर मातृभाषा निरुपयोगी’ हे आपल्या समाजाने सिद्ध केले. तो निर्णयानंतर बदललेल्या शासनाने मागील पानावरून पुढे चालू ठेवला. माहिती तंत्रज्ञान हा (कोणत्याही) भाषेला पर्याय असू शकत नाही. जगण्याकरिता आपल्या भाषेचा भक्कम आधार लागतो, हे भान आपण विसरत चाललो. त्यामुळे उच्चशिक्षणातील आणि शालेय शिक्षणातील मराठी आपण हद्दपार करत चाललो आहोत, हे आजचे रोखठोक वास्तव आहे. त्यात महाविद्यालयीन विश्वात फ्रेंच, जपानी, जर्मन या विदेशी भाषांनी आज मराठीचा अवकाश वेगाने गिळंकृत करायला सुरुवात केली आहे.
मराठी ही प्रांतभाषा, राज्यभाषा म्हणून तिचे महत्त्व आहे. त्यामुळे नोकरी धंद्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या अमराठी कुटुंबातील विद्यार्थी मराठी शिकू पाहतात, पण त्यांची सोय केलेली नसते. अनेक महविद्यालयातील प्रवेश घेण्याच्या फॉर्म्समध्ये मराठी, निम्नस्तर मराठी हे विषय दिलेले नसतात. त्यामुळे ते विद्यार्थी आज हिंदीसारख्या विषयाकडे वळतात.
कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना इंग्रेजी भाषा विषय बंधनकारक आहे. तशाच प्रकारे मराठी भाषा विषय बंधनकारक करण्यात यावा. मराठी भाषेला पर्याय ठेवू नये. हल्लीच्या युगात मराठी भाषा लोप पावत चालली आहे. आपली मराठी भाषा टिकवणे, वाढविण्यासाठी मराठी भाषा हा विषय पर्याय न ठेवता बंधनकारक करावा. कॉलेजमध्ये प्रशासकीय व ग्रंथालयामध्ये मराठी भाषा वापरणे अनिवार्य करावे. तसेच ग्रंथालयात अनेक शास्त्रज्ञांची पुस्तके इंग्रेजी भाषेत असून जास्तीत-जास्त मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात यावीत. अशी मागणी मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.

Intro:
मराठी भाषा विषय इंटरनँशनल शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सक्तीचा करावा

मुंबई राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस

मुंबई महाराष्ट्रातील शाळामध्ये पहिली ते दहावी पर्यत मराठी भाषा विषय शिकवणे बंधनकारक असून तीच परंपरा इंटरनँशनल,व वर्ल्ड शाळा , कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य व विज्ञान शाखेत कायम ठेवावी. अशी मागणी मुंबई राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसने आज शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांचे कडे केली.Body:
मराठी भाषा विषय इंटरनँशनल शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सक्तीचा करावा

मुंबई राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस

मुंबई महाराष्ट्रातील शाळामध्ये पहिली ते दहावी पर्यत मराठी भाषा विषय शिकवणे बंधनकारक असून तीच परंपरा इंटरनँशनल,व वर्ल्ड शाळा , कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य व विज्ञान शाखेत कायम ठेवावी. अशी मागणी मुंबई राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसने आज शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांचे कडे केली.

अकरावी-बारावीच्या स्तरावर पूर्वी महाविद्यालयात अभ्यास विषय निवडताना विध्यार्थी मातृभाषेची निवड करत होते . इंग्रजी विषय अनिवार्य असल्याने इंग्रजी ने प्रथम भाषेचे स्थान घेतले आणि मातृभाषा द्वितीय स्थानावर आल्याने विध्यार्थीना विदेशी भाषांचे पर्याय उपलब्ध करून दिले गेले. महाविद्यालयांमध्ये फ्रेंच, जपानी अशा विदेशी भाषा निवडणारी मुले हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी असायची. शिक्षणाच्या क्षेत्रातल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे गुणांचे महत्त्व इतके वाढले की हाच एक मुद्दा पालकांच्या दृष्टीने महत्त्वाचा झाला.
शिक्षणासंदर्भात बोलायचे झाले तर इंग्रजी शाळा, कॉन्व्हेंट्स यांचे पेव तर फुटलेले होतेच, पण भरीस भर म्हणजे इंटरनॅशनल, वर्ल्ड स्कूल यांची संख्या महाराष्ट्रात वाढतच गेली.या शाळांमध्ये मराठी केवळ नावालाच! तिथे प्रस्थ फॉरिन लँग्वेजेसचे! तिथला मराठीचा स्तर जेमतेमच!अशा शाळांमधील मराठी आणि महाविद्यालयीन स्तरावरची मराठी यांच्यात मग केवढे तरी अंतर पडत जाते.दुसऱ्या बाजूला जगाची दारे ठोठावायला निघालेल्या या पिढीला आपली भाषा कुचकामी वाटते.‘मराठी टक्का हिंदीकडे वळतो आहे’ ही चर्चा चांगलीच तापली आहे; पण ‘मराठी भाषेची निवड करणारे विद्यार्थी अकरावी-बारावीच्या स्तरावर कमी होतायत.
माहिती तंत्रज्ञानासमोर मातृभाषा निरुपयोगी’ हे आपल्या समाजाने सिद्ध केले. तो निर्णय नंतर बदललेल्या शासनाने मागील पानावरून पुढे चालू ठेवला. माहिती तंत्रज्ञान हा (कोणत्याही) भाषेला पर्याय असू शकत नाही. जगण्याकरिता आपल्या भाषेचा भरभक्कम आधार लागतो, हे भान आपण विसरत चाललो. त्यामुळे उच्चशिक्षणातील आणि शालेय शिक्षणातील मराठी आपण हद्दपार करत चाललो आहोत, हे आजचे रोखठोक वास्तव आहे. त्यात महाविद्यालयीन विश्वात फ्रेंच, जपानी, जर्मन या विदेशी भाषांनी आज मराठीचा अवकाश वेगाने
गिळंकृत करायला सुरुवात केली आहे.
मराठी ही प्रांतभाषा, राज्यभाषा म्हणून तिचे महत्त्व आहे. त्यामुळे नोकरी धंद्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या अमराठी कुटुंबातील विद्यार्थी मराठी शिकू पाहातात, पण त्यांची सोयच केलेली नसते. अनेक महविद्यालयातील प्रवेश घेण्याच्या फॉर्म्समध्ये मराठी, निम्नस्तर मराठी हे विषयच दिलेले नसतात. त्यामुळे आज ते विद्यार्थी हिन्दीसारख्या विषयाकडे वळतात.

कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना इंग्रेजी भाषा विषय बंधनकारक आहे .तशाच प्रकारे मराठी भाषा विषय बंधनकारक करण्यात यावा. मराठी भाषेला पर्याय ठेवू नये. हल्लीच्या युगात मराठी भाषा लोप पावत चालली आहे. आपली मराठी भाषा टिकवणे,वाढविण्यासाठी मराठी भाषा हा विषय पर्याय न ठेवता बंधनकारक करावा.कॉलेजमध्ये प्रशासकीय व ग्रंथालयामध्ये मराठी भाषा वापरणे अनिवार्य करावे.तसेच ग्रंथालयात अनेक शास्त्रज्ञांची पुस्तके इंग्रेजी भाषेत असुन जास्तीजास्त मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात यावी.अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबई अध्यक्ष एड. अमोल मातेले यांनी आज उपसंचालक राजेंद्र अहिरे यांची भेट घेऊन केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.