ETV Bharat / city

actress khushbhu tawade: गोड बातमी! खुशबू- संग्राम झाले आई-बाबा - मराठी अभिनेत्री खुशबू

छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेली मराठी अभिनेत्री खुशबू तावडे हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. खुशबूने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. खुशबूने आपल्या मुलाच्या जन्माची बातमी देताना त्याचे नावही चाहत्यांना सांगितले आहे.

marathi actress khushbhu tawade -give-birth-to-baby-boy
खुशबू- संम्राम समेळला पुत्ररत्न
author img

By

Published : Nov 16, 2021, 1:51 PM IST

Updated : Nov 16, 2021, 5:17 PM IST

मुंबई - छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेली मराठी अभिनेत्री खुशबू तावडे (Marathi Actress Kushboo Tawade ) हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. खुशबूने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. खुशबूने आपल्या मुलाच्या जन्माची बातमी देताना त्याचे नावही चाहत्यांना सांगितले आहे.

marathi actress khushbhu tawade -give-birth-to-baby-boy
मराठी अभिनेत्री खुशबू तावडे हिची सोशल मीडिया अकाउंटवरील पोस्ट

काय आहे खुशबूच्या मुलाचे नाव -

खुशबू तावडेने २ नोव्हेंबर २०२१ रोजी गोंडस बाळाला जन्म दिला. खुशबूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून बाळाच्या हाताचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने बाळाचे नावही चाहत्यांसोबत शेअर केले आहे. तिने लिहिले आहे की, 'राघव २/११/२०२१ खूप खूप धन्यवाद आम्हाला तू निवडल्याबद्दल.'

5 मार्च 2018मध्ये खुशबू आणि संग्राम यांनी लग्नगाठ बांधली होती. हे दोघेही अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे. संग्राम हा 'देवयानी' या मालिकेतून संग्राम हा घरघरात पोहोचला होता. या मालिकेतील 'तुमच्यासाठी काय पन' हा लोकप्रिय डायलॉग नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या ओठावर असायचा.

मराठी बरोबरच हिंदी मालिकेमध्ये खुशबूने भूमिका केल्या आहेत. 'तारक मेहता का उल्टा चष्मा', 'प्यार की एक कहानी' या हिंदीतील तर पारिजात, आम्ही दोघी, भेटशील तू नव्याने आणि देवयानी या मराठी मालिकांमध्ये काम केलेले आहे. तिने अभिनयातून नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.

हेही वाचा - विजय देवरकोंडाने शेअर केला माइक टायसनसोबतचा फोटो.. म्हणाला, "हा माणूस म्हणजे प्रेम आहे"

Last Updated : Nov 16, 2021, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.