ETV Bharat / city

संभाजीराजेंची बदनामी थांबवा, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा - मुंबई मराठा क्रांती मोर्चा बातमी

छत्रपतींना आदेश देता ? तिथे सांगितलं जातं तुम्हाला पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेश पाळावे लागतील. मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल किंवा कोणत्या आरक्षणावरती तुम्हाला बोलता येणार नाही, पक्षाचा आदेश घेऊन बोलाव लागेल. सभागृहामध्ये सुद्धा तुम्हाला चर्चा करायची असेल ते पण पक्षाच्या आदेशानुसार करावी लागेल. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी अटी नियम आणि आदेश देण्याच्या काम केलं होतं. सगळ्यात महत्त्वाचा विषय की पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे आदेश पाळावे लागतील.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा
मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा
author img

By

Published : May 28, 2022, 9:36 PM IST

Updated : May 28, 2022, 10:29 PM IST

मुंबई - छत्रपती युवराज संभाजी राजे काही राजकीय पक्षाकडे किंवा कुणाकडे मला खासदारकी द्या म्हणून गेले नव्हते. कार्यकर्त्यांनी आग्रहाची भूमिका घेतली होती की पाच जागा झाल्यानंतर सहाव्या जागेसाठी उरणारी मते आपल्याला मिळावीत. पक्षाचे मतदान हे छत्रपती युवराज संभाजी राजांना द्यावं आणि त्यांना राज्यसभेचा मार्ग मोकळा करावा, असे आवाहन करण्यात आलं होतं. परंतु या गोष्टीचा कुठेतरी चुकीच्या पद्धतीने राजकारण होत असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केला आहे.

संभाजीराजेंची बदनामी थांबवा, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

न मागता पाठिंबा देऊन दिशाभूल - शरद पवार साहेबांनी त्यांना न मागता पाठिंबा दिला, दुसरा मुद्दा उद्धव ठाकरेंनी सांगितलं की तुम्ही आमच्या बाजूने उभे रहा आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो कोणाच्या सगळ्या चर्चा झाल्यानंतर उद्धव साहेब ठाकरेंनी की त्यानंतर घुमजाव केलं. अगोदर शब्द दिला आणि नंतर सांगितले की पक्ष पुरस्कृत आघाडी पुरस्कृत न होता, आता राजे तुम्हाला शिवसेना पुरस्कृत व्हावे लागेल. त्याच्यानंतर कोणीतरी शिष्टमंडळ पाठवलं ते दोन खासदार आणि त्यांचे कोणते प्रति मुख्यमंत्री नार्वेकर पाठवले आणि त्यांना ड्राफ्ट करू दिला. ज्या काही गोष्टी घडल्या ह्या जनतेसमोर गेल्या नाहीत, राजांनी का माघार घेतली राजे का त्याला विरोध केला हे तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला का, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.

ठाकरे यांचे आदेश पाळण्याची अट - छत्रपतींना आदेश देता ? तिथे सांगितलं जातं तुम्हाला पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेश पाळावे लागतील. मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल किंवा कोणत्या आरक्षणावरती तुम्हाला बोलता येणार नाही, पक्षाचा आदेश घेऊन बोलाव लागेल. सभागृहामध्ये सुद्धा तुम्हाला चर्चा करायची असेल ते पण पक्षाच्या आदेशानुसार करावी लागेल. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी अटी नियम आणि आदेश देण्याच्या काम केलं होतं. सगळ्यात महत्त्वाचा विषय की पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे आदेश पाळावे लागतील. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेऊन तुम्ही पक्ष चालवता. सत्ता आल्यावर सांगता की आमच्या आदेश मानावे लागतील आणि कोण तो संजय राऊत आम्हाला शिवबंधन बांधायला सांगता. यांच्या नावाने पक्ष चालवता त्यांच्या घराण्यातील वारसदारालाच शिवबंधन बांधायला सांगता का? असा सवालही पाटील यांनी केला.

ठाकरेंनी केली फसवणूक - राज्यातल्या जनतेला समजलं पाहिजे की या उद्धव ठाकरेंनी छत्रपती युवराज संभाजी राजांचा कशी त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. कशा पद्धतीने घुमजाव केले आहे. हे सांगा ना ते तुमच्याकडे आले नव्हते की मला उमेदवारी द्या, मला खासदारकी द्या म्हणून तुम्ही सांगितलं होतं त्यांनी फक्त आवाहन केलं होतं आणि तुमच्या नियमाची शर्ती बघितल्यानंतर संभाजीराजांनी सांगितलं की हे आम्हाला मान्य नाही. मी स्पष्ट भूमिका केलेली आहे की सर्वपक्षीय मी सगळ्यांना आवाहन केले यातून मला जर तुम्ही संधी देत असाल तर मी जातो मला खासदारकी त्यांना घ्यायची असती तर ते कधीच तुमच्या दावणीला बांधले असते. स्वाभिमान गहाण ठेवता? छत्रपती संभाजी राजांनी तुमच्या त्या खासदारकीला लाथ मारलेली आहे. कारण छत्रपतींना कोणाच्या आदेश मान्य नाही आणि तुम्ही आदेश त्यांना द्यावे एवढे मोठे नाहीत, एवढे लक्षात ठेवा, असेही आबासाहेब पाटील यांनी सांगितले.

Last Updated : May 28, 2022, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.