ETV Bharat / city

विशेष : कामगारांची अनुपलब्धता; तरीही हॉटेल्स होणार का सुरु ? - corona updates maharashtra

लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस उद्यापासून (बुधवार, दि. 8 जुलै) ३३ टक्के क्षमतेत सुरू होणार आहेत. मात्र, हॉटेल सुरू करताना हॉटेल चालक आणि मालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचा आढावा ईटीव्ही भारतने घेतला आहे.

hotel mumbai
हॉटेल मुंबई
author img

By

Published : Jul 7, 2020, 7:37 PM IST

Updated : Aug 1, 2020, 12:58 PM IST

मुंबई - राज्य सरकारने लॉकडाऊनमधील अटींमध्ये सवलत देत मिशन बिगिन अगेन सुरू केले आहे. त्यानुसार उद्या (बुधवार) 8 जुलैपासून हॉटेल सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, हॉटेल चालकांकडे आवश्यक तितके मनुष्यबळ नसल्याने हॉटेल्स खरेच सुरू होतील का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस उद्यापासून ३३ टक्के क्षमतेत सुरू होणार आहेत. मात्र, हॉटेल सुरू करताना हॉटेल चालक आणि मालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचा आढावा ईटीव्ही भारतने घेतला आहे.

सरसकट हॉटेल सुरू करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. प्रतिबंधित क्षेत्रात अद्यापही हॉटेल सुरू करता येणार नाहीत. मुंबईमध्ये नव्या नियमावलीनुसार अनेक क्षेत्रे अजूनही कंटेन्मेंट झोनमध्ये येतात. त्यामुळे अनेक हॉटेल मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हॉटेल पूर्णपणे बंद होती. त्यामुळे या व्यवसायात कोणतेही उत्पन्न नव्हते. हॉटेल मालक तसेच कर्मचारी ही त्यामुळे अडचणीत आहेत. मात्र, मुंबईत काही ठिकाणी का होईना सुरू होत आहे, हे महत्त्वाचे आहे. सरकारचे धन्यवाद पण हॉटेल सुरळीत होण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. कामगार जे परराज्यात गेले आहेत, त्यांना परत यायला वेळ लागेल. त्यामुळे हळूहळू जमवाजमव करून आम्ही हॉटेल उद्यापासून सुरू करत आहोत, असे दादर येथील प्रसिद्ध हॉटेल मनोहरच्या मालकांनी सांगितले.

कामगार मुळगावी गेल्याने हॉटेल व्यावसायिकांपुढे हॉटेल पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक अडचणी....

हेही वाचा - अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

लॉजिंगची व्यवस्था असलेली हॉटेल सुरू करण्यासाठी अटी आहेत. केवळ 33 टक्के आस्थापनेवर हॉटेल सुरू करता येतील. कोविडच्या आपत्ककालीन स्थिती अर्थात क्वारंनटाईनसाठी 67 टक्के खोल्या राखून ठेवाव्या लागतात. प्रवासी वाहतुकीवरील बंदीमुळे हॉटेलमध्ये राहण्यासाठी कोण येणार, असा प्रश्‍न आहे. ज्या 33 टक्के भागावर परवानगी दिली गेली आहे, तेथे राहणाऱ्या प्रवाशांच्या सॅनिटायझरसह हॅन्ड वॉश व्यवस्था हॉटेल चालकांनाच करावी लागणार आहे. ग्राहकाने खोली सोडल्यानंतर निर्जंतुकीकरण करावे लागेल. त्यानंतर 24 तास खोली वापरण्यास मनाई असेल.

सध्या वेळेच्या अधीन राहून पार्सल देण्यास हॉटेलचालकांना परवानगी दिली गेली आहे. शासनाने लॉजिंगमध्ये 33 टक्के खोल्या भरतील इतक्‍या प्रवाशांना परवानगी दिली आहे. ज्या हॉटेल्समध्ये लॉजिंगची व्यवस्था आहे, तेथे जे प्रवाशी उतरतील त्यांनाच जेवण देता येईल. पूर्णपणे उपहारगृह सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. अशा नियमात राहून आपला व्यवसाय कसा चालणार, असे साई लॉजिंग बोर्डिंगचे प्रदीप राठोड यांनी सांगितले.

मुंबईत प्रामुख्याने 20 टक्के पेक्षा जास्त रेस्टॉरंट्स व्यवसायासाठी पुन्हा उघडण्यास सक्षम नाहीत . कारण कर्मचार्यांची कमतरता, उच्च भाडे आणि कर, तसेच 80०% पेक्षा जास्त कर्मचारी गावी गेलेत ते अद्याप परतलेले नाहीत.त्यामुळे सरकारने जे कर्मचारी गावी गेलेत त्यांची येण्याची व्यवस्था करावी. उपहारगृहात आमच्याकडे स्टाफ कमी असला तरीही थोड्याशा स्टाफमध्ये आम्ही व्यवसाय सुरू करणार आहोत असे दादर येथील टेस्ट ऑफ मिसळ या हॉटेलच्या मालकांनी सांगितले.

हेही वाचा - 'कोव्हॅक्सिन'च्या क्लिनिकल चाचणीसाठी हैदराबादमध्ये नोंदणी सुरू..

कमीतकमी 50 टक्के मर्यादेत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिली पाहिजे होती. वेळ अशी दिली आहे की, हॉटेल सुरू करावे की, नाही हेच कळत नाही. आम्हाला हळूहळू आपले व्यवसाय रुळावर आणायला वेळ लागणार आहे. 33 टक्केच उपहारगृह सुरू करणार तर कमावणार किती, कर्मचाऱ्यांचा पगार किती द्यायचा, सुरक्षिततेसाठी वस्तूचे पैसे किती लागतील, भाडे आणि कर किती द्यायचे हे प्रश्न पडले आहेत. त्यामुळे हॉटेल सुरू करताना आम्हाला मोठ्या अडचणींना आता सामोरे जावे लागणार आहे, असे हॉटेल चालक आणि मालकांची संघटना आहारचे अध्यश सुकेश शेट्टी यांनी सांगितले.

आम्ही हॉटेल व रेस्टॉरंट संघटनांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून ज्या मागण्या त्यांच्याजवळ मांडल्या त्यातरी किमान पूर्ण केल्या असत्या तरी आम्हाला दिलासा मिळाला असता. पण आता सरकारने जे सुरू नियम व अटी देत सुरू करण्यास परवानगी दिली आहे, त्यानुसार आम्ही थोडं थोडं सुरू करणार आहोत असे नाराजीचा सुरात शेट्टी यांनी सांगितले.

दरम्यान, गेले तीन महिने हॉटेल सुरू नसल्याने अनेकांची खाण्या-पिण्याची अडचण होती. ती आता अडचण आता काही अशी दूर होईल, असे अत्यावश्यक सेवेतील काही कर्मचाऱ्यांनी व ग्राहकांनी सांगितले. एकंदर सरकारने हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी हा व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास अजून बराच कालावधी लोटणार, असे चित्र दिसत आहे.

Last Updated : Aug 1, 2020, 12:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.