मुंबई - मनसुख हिरेन यांनी माध्यम आणि पोलीस कर्मचारी यांच्याकडून मला त्रास होत आहे, असे एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं होत. हा मजकूर तयार करण्यासाठी मुंबईतील वकील एच. के. गिरी यांनी मनसुख हिरेन यांची मदत केली होती. याच संदर्भात एनआयएने त्यांना आज स्टेटमेंट नोंदविण्यासाठी बोलवले आहे.
वकील एच. के. गिरी यांनी सांगितले की मनसुख हिरेन यांना पत्र तयार करण्यासाठी मी मदत केली होती. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएने आपल्याकडे घेतला आहे. त्यामुळे हिरेन यांच्या पत्रासंदर्भात स्टेटमेंट नोंदविण्यासाठी गिरी यांनी NIA कार्यालयात बोलाविण्यात आले आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. तपास एनआयएकडे सोपवल्याने सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. अँटिलिया कारमध्ये स्फोटक सापडल्याच्या प्रकरणाचा तपास एनआयए करत असून आता या प्रकरणाचा तपासदेखील एनआयए करणार आहे.
हे ही वाचा - 'लॉकडाऊन हा पर्याय नाही; पण, प्रशासनाला वाटत असेल तर विरोध नाही'