ETV Bharat / city

साहिल खानविरुद्ध गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेत साहिल खान म्हणाला- मनोज पाटील बनावट आणि कालबाह्य स्टिरॉइड्स विकायचा - मनसेचा साहिल खानला इशारा

बुधवारी रात्री मनोज पाटीलने आत्महत्या करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मनोज पाटीलने अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावरही व्हिडीओ शेअर करत हे आरोप केले होते.त्यानंतर साहिलने आपली बाजू मांडली आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोज पाटीलने राज फौजदार नामक एका बॉडी बिल्डरला बनावट आणि कालबाह्य झालेले स्टिरॉइड्स विकले होते. ज्याची किंमत दोन लाख रुपये होती. जेव्हा राज फौजदार यांनी साहिलला याबाबत माहिती दिली, तेव्हा साहिलने हे रॅकेट उघड करण्यासाठी सोशल मीडियावर मनोजच्या विरोधात गोष्टी लिहिल्या

म्हणून मी समाज माध्यमावर लिहले- साहिल खान

author img

By

Published : Sep 17, 2021, 9:32 AM IST

Updated : Sep 17, 2021, 5:55 PM IST

मुंबई - बॉडी बिल्डर आणि माजी मिस्टर इंडिया, मनोज पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोजने या आत्महत्येच्या प्रयत्नासाठी चित्रपट अभिनेता आणि सोशल मीडियावर प्रभावकार साहिल खानला दोषी ठरवले. त्यानंतर साहिलने आपली बाजू मांडली आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोज पाटीलने राज फौजदार नामक एका बॉडी बिल्डरला बनावट आणि कालबाह्य झालेले स्टिरॉइड्स विकले होते. ज्याची किंमत दोन लाख रुपये होती. जेव्हा राज फौजदार यांनी साहिलला याबाबत माहिती दिली, तेव्हा साहिलने हे रॅकेट उघड करण्यासाठी सोशल मीडियावर मनोजच्या विरोधात गोष्टी लिहिल्या जेणेकरून सर्वांना त्याबद्दल माहिती मिळेल, असे साहिलने पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी सांगितले आहे, की साहिल खान आणि अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज पाटीलला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

म्हणून मी समाज माध्यमावर लिहले- साहिल खान
मनोज पाटील याने साहिल खानवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री साहिल खानने पत्रकार परिषद घेत या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे. बॉडी बिल्डर मनोज पाटीलने राज फौजदार नामक एका बॉडी बिल्डरला बनावट आणि कालबाह्य झालेले स्टिरॉइड्स विकले होते. ज्याची किंमत दोन लाख रुपये होती. जेव्हा राज फौजदार यांनी साहिलला याबाबत माहिती दिली, तेव्हा साहिलने हे रॅकेट उघड करण्यासाठी सोशल मीडियावर मनोजच्या विरोधात सोशल मीडियावर त्याची वाच्यता केली, जेणेकरून सर्वांना त्याबद्दल माहिती होईल.

पाटील यांनी विकलेली स्टिरॉइड्स आणि त्याची सर्व बिले दाखवत साहिल म्हणाला की, जेव्हा राज फौजदारांनी त्याच्याकडे तक्रार केली आणि पैसे परत मागितले. तेव्हा मनोजने तसे केले नाही आणि त्याला धमकी दिली. साहिलखान पुढे म्हणाला की मनोज बनावट स्टेरॉईडच्या मोठ्या रॅकेटमध्ये सामील आहे आणि ते उघड करण्यासाठी त्याने सोशल मीडियावर अनेक गोष्टी सांगितल्या. औषधांप्रमाणे, बनावट आणि कालबाह्य झालेले पूरक आहार अशा प्रकारे विकणे हा तितकाच मोठा गुन्हा आहे. त्यामुळे मी समाज माध्यमावर त्याच्याविरोधात लिहले. आता त्याची रीतसर तक्रारही करणार असल्याचे साहिल खानने स्पष्ट केले.

मनोजच्या आरोपानुसार, एकदा साहिल देखील त्याच्या इमारतीखाली आला होता. यावर साहिल म्हणाला की, तो त्याच्या एका मित्राला त्याच इमारतीत भाडे तत्वावर घेण्यासाठी घर दाखवायला गेला होता. मनोजसह त्याच्या पत्नीच्या षड्यंत्राच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की , हा प्रश्न त्याच्या पत्नीला विचारला पाहिजे. तसेच मी त्यांना ओळखतही नसल्याचे साहिलने स्पष्ट केले. याचबरोबर साहिलने मनोजचा पासपोर्ट रद्द करण्याचा कट रचला होता का? हा आरोप साहिलने स्पष्टपणे फेटाळून लावला आहे.

यावेळी राज फौजदार यांनी देखील मनोजने कालबाह्य झालेले स्टिरॉइड्स विकल्यानंतर त्याला पैसे कसे परत केले नाही. त्याला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप केला. या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार करून आपण आपली बाजू मांडणार असल्याचे साहिलने सांगितले. माझ्याकडे मनोजच्या विरोधात सर्व पुरावे असल्याचेही साहिल म्हणाला.

काय आहे प्रकरण?

बुधवारी रात्री मनोज पाटीलने आत्महत्या करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मनोज पाटीलने अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावरही व्हिडीओ शेअर करत हे आरोप केले होते. त्रास आणि बदनामीमुळेच आपण आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचे मनोज पाटीलने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. मिस्टर इंडिया राहिलेला मनोज पाटील मिस्टर ऑलिम्पियासाठी प्रयत्न करत होता. साहिल खानलाही या स्पर्धेत उतरायचं होतं. यामुळेच साहिल खान आपण स्पर्धेत सहभागी होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा मनोज पाटीलचा आरोप आहे. याशिवाय व्यावसायिक तसेच इतर वादही होते. याशिवाय साहिल खान सोशल मीडियावर आपली बदनामी करत होता, असेही मनोज पाटीने म्हटले आहे.

हेही वाचा - मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलने केला आत्महत्येचा प्रयत्न, अभिनेता साहिल खानवर आरोप

हेही वाचा - साहिल खान मनसेच्या कार्यालयात आला नाही, तर... ; मनोज पाटील प्रकरणात मनसेची उडी

Last Updated : Sep 17, 2021, 5:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.