मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंबद्दल भाजपच्या आयटी सेल प्रमुखाने आक्षेपार्ह ट्वीट केले ( bjp activist jiten gajaria offensive tweet ) आहे. या विकृत मनोवृत्तीच्या लोकांवर त्वरीत कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना आमदार मनिषा कांयदे यांनी सायबर पोलिसांकडे केली आहे. तसेच स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या आणि संघ परिवारातून निर्माण झालेल्या भाजपच्या नव्या संस्कृतीचे दर्शन यातून घडत असल्याची जोरदार टीका आमदार कायंदे ( Manisha Kayande Criticized BJP ) यांनी केली.
भाजपच्या आयटी सेल प्रमुखाकडून आक्षेपार्ह विधान -
भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारीया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्विट करताना आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबतही ट्वीटवर आक्षेपार्ह लिखाण केले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने याबाबत त्यांना नोटीस बजावली होती. आज गजारिया यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. भाजपच्या सोशल मीडिया प्रभारींनी अशाप्रकारे आक्षेपार्ह भाषेचा वापर करणे, गंभीर असल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातो आहे. शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी देखील यावरुन भाजपला खडे बोल सूनावले.
भाजप नव्हे ट्रोल पार्टी -
रश्मी ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केला आहे. भाजपची नवी संस्कृतीचे दर्शन यातून घडत आहे. स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणणारे, संघ परिवारातून निर्माण झालेला पक्ष आणि स्वतःला सुसंस्कृत म्हणणारी मंंडळी अशा प्रकारच्या विकृत मनोवृत्तीची झाली आहेत. केवळ राज्यात सत्ता आली नाही. त्यामुळे राजकारणाशी दुरान्वय संबंध नसलेल्या रश्मी ठाकरे केवळ मुख्यमंत्र्यांच्या पत्नीही आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले जात आहे. एखाद्याचा अपमान करणे, जलील करणे ही ट्रोलर्सची पार्टी तयार झाली. भाजप नव्हे ट्रोल पार्टी झालेली आहे. या प्रकारचे विकृती मनोवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांचे खाते बंद करावे, सायबर पोलिसांना विनंती करते. शिक्षेच्या सर्व तरतूदी त्वरीत कराव्या, अशी मागणी कायंदे यांनी केली.