मुंबई - झाडांचा होणारा ऱ्हास आणि इतर कारणांमुळे उष्माघात होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यावर उपाय म्हणजे एकच ते म्हणजे झाडे लावणे. त्यामुळे आता झाडे लावण्यासाठी मुंबईतील 'मिशन ग्रीन मुंबई' ही सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. सध्या उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये सर्वांच्या घरी आंबे येत आहेत. आपण आंबे खातो परंतु त्याच्या कोय फेकून देतो. परंतु हे न करता आंबे खाऊन त्याची कोय धुऊन सुकून मिशन ग्रीन मुंबई ( Mission Green Mumbai Social organization ) यांच्या पत्त्यावर पाठऊन द्या. लोकांनी दिलेल्या कोय आम्ही आमच्या नर्सरीवर ( Mango seeds ) नेतो यापासून छोटी छोटी रोपटी बनवली जातात. ही रोपटी मग आम्ही जी गरजू कुटुंब आहेत त्यांना देत त्या झाडाचं संगोपन ( Mango seedlings ) करण्यास सांगतो. यामुळे पर्यावरण संवर्धन करण्यास मोठी मदत होते, अशी प्रतिक्रिया मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक सुभजित मुखर्जी ( Subhajit Mukherjee founder of Mission Green Mumbai ) यांनी दिली आहे.
मिशन 1 लाख रोपटी : मागील तीन वर्षांपासून आम्ही हे आंब्याच्या कोय मागवण्याचे काम करत आहोत. मागील वर्षी आम्हाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. आम्ही सोशल मीडियाद्वारे देशातील जनतेला आवाहन केले आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी त्यांनी खाल्लेल्या आंब्यांच्या कोय आम्हाला कुरिअरने पाठवल्या. त्यांची संख्या इतकी जास्त होते की त्या साधारण 40 ते 50 हजार होत्या. या सर्व कोय आम्ही आमच्या नर्सरीवरती नेल्या आणि त्यांचे रोपटी लावली. सद्य स्थितीला या कोयांपासून 8000 सुदृढ रोपटी आमच्याकडे तयार आहेत. आमचे मिशन आहे यावर्षी कमीत कमी एक लाख तरी कोया गोळा करून जास्तीत जास्त रोपटी लावायची आणि जगवायची, असे सुभजित मुखर्जी सांगतात.
'सरकारचे सहकार्य मोलाचे' : हे मिशन एकट्याने काम करण्यातच नाही. या मिशनमध्ये आम्हाला सरकारचे खूप मोलाचे सहकार्य आहे. आम्हाला केंद्र सरकार, राज्य सरकार, बृहमुंबई महानगरपालिका या सर्व स्थापना खूप सहकार्य करतात. यांनीच आम्हाला जागा उपलब्ध करून दिली असून आर्थिक मदत देखील करतात. प्रशासनाने आम्हाला त्यांचे कुशल कर्मचारी दिले आहेत. जे शास्त्रोक्त पद्धतीने रोपवाटिका लागवड जाणतात. त्यांचा तो हातखंडा आहे. अशा या सरकारी कर्मचाऱ्यांकडे आम्ही या कोया नेऊन देतो त्याची ते लागवड करतात.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित : सुभजीत यांनी केलेल्या या हरित क्रांतीच्या कामासाठी त्यांना केंद्र सरकार सह अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. त्यांना जलशक्ती मंत्रालयाचा वॉटर हिरो, मदर तेरेसा मेमोरियल अवर्ड, महिंद्रा ग्रुप अवर्ड, मुंबई महानगरपालिकेचा वॉटर हिरो पुरस्कार, भारतीय रेल्वेने देखील त्यांना मानाचे पुरस्कार देऊन गौरवले आहे. अशा अनेक पुरस्कारांनी सुभजित यांना सन्मानित करण्यात आल आहे.
हेही वाचा - NCP Ghagar Agitation Aurangabad : भाजपाच्या आंदोलनापूर्वीच राष्ट्रवादीचे 'घागर आंदोलन'