ETV Bharat / city

विक्षिप्तपणाचा कळस; सोसायटीच्या भांडणाचा बदला घेण्यासाठी अश्लील संकेतस्थळावर अपलोड केले महिलेचे फोटो

सोसायटीत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी आरोपीने महिलेचे फोटो अश्लील संकेतस्थळावर अपलोड केले. त्यामुळे पीडित महिलेला शरीरसंबंध ठेवण्यासाठी रात्री बेरात्री कॉल येत होते. त्यामुळे पीडिता त्रासली होती.

आरोपी अल्पेश बल्लभदास पारेख
author img

By

Published : May 18, 2019, 12:39 PM IST

मुंबई - सोसायटीच्या बैठकीत झालेल्या वादातून महिलेचा फोटो अश्लील संकेतस्थळावर अपलोड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अल्पेश बल्लभदास पारेख, असे या आरोपीचे नाव आहे. त्याचे मालाड परिसरातील महिलेशी सोसायटीच्या बैठकीत भांडण झाले होते.

मालाड परिसरातील संबंधित 37 वर्षीय महिला एका बँकेत नोकरीला आहे. गेल्या काही दिवसांपासून या महिलेच्या मोबाईलवर वेगवेगळ्या क्रमांकावरून शरीर संबंध ठेवण्यासाठी रात्री-अपरात्री कॉल येत होते. सुरवातीला पीडित महिलेने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. मात्र सतत येणारे फोन कॉल, वाट्सअॅपवर लैंगिक सुख व रिलेशनशिप ठेण्यासाठी येणाऱ्या मेसेजमुळे महिला त्रासली होती. त्यामुळे पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पीडितेला काही दिवसांनंतर पुन्हा एका पुरुषाने कॉल करून विचारणा केली. यावेळी पीडित महिलेने माझा मोबाईल क्रमांक कुठून मिळाला, असे विचारले. कॉल करणाऱ्या व्यक्तीने या महिलेला एका संकेतस्थळावरील लिंक पाठवली. ही लिंक पाहताच त्या महिलेला धक्काच बसला. या संकेतस्थळावर या महिलेसोबत तिच्या इमारतीत राहणाऱ्या आणखीन एका महिलेचा फोटो असल्याचे आढळून आले. त्यामुळे हादरलेल्या महिलेने याबाबतची माहिती बांगूर नगर पोलीस ठाण्यात दिली. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने या घटनेचा तपास सुरू केला.

सोसायटीच्या बैठकीत झालेल्या वादातून सूड उगविण्याचा प्रयत्न -

पीडित महिला व तिचा पती राहत असलेल्या इमारतीच्या कार्यकारिणी समितीचे सभासद आहेत. 15 एप्रिलला सोसायटी कमिटीच्या पार पडलेल्या बैठकीत पीडित महिलेचे त्याच इमारतीतील कस्टम ट्रान्सपोर्ट क्लियरिंगचे काम करणाऱ्या अल्पेश पारेख (47) याच्याशी भांडण झाले होते. हा राग मनात धरून अल्पेशने अश्लील संकेतस्थळावर या महिलेचा वाटसअॅप क्रमांक आणि फोटो पोस्ट केल्याचे पोलीस तापासत उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी आरोपी अल्पेशला अटक केली आहे.

Intro: सोसायटीच्या मीटिंग मध्ये झालेल्या वादाचा राग मनात धरून एका महिलेचा संपर्क क्रमांक व फोटो locanto.net या अश्लील संकेतस्थळावर टाकणाऱ्या अलपेश वल्लभदास पारेख या 47 वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. Body:मालाड परिसरात राहणाऱ्या व एका बँकेत काम
करणाऱ्या 37 वर्षीय महिलेला गेल्या काही दिवसांपासून तिच्या मोबाईलवर वेगवेगळ्या क्रमांकावरून शरीर संबंध ठेवण्यासाठी सतत रात्री अपरात्री कॉल येत होते. सुरवातीला पीडित महिलेने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते मात्र सतत येणारे फोन कॉल , वाटस आप वर लैंगिक सुख व रिलेशनशिप ठेण्यासाठी येणाऱ्या मेसेज मुळे त्रासलेल्या पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. Conclusion:काही दिवसांनी सदरच्या या महिलेला पुन्हा एका पुरुषाने कॉल करून विचारणा केली असता पीडित महिलेने माझा मोबाईल क्रमांक कुठून मिळाला म्हणून विचारले . कॉल करणाऱ्या व्यक्तीने या महिलेला locanto.net या संकेतस्थळावरील लिंक पाठवली असता , या संकेतस्थळावर या महिला सोबत तिच्या इमारतीत राहणाऱ्या आणखीन एका महिलेचा फोटो असल्याचे आढळून आले. याची माहिती बांगुर नगर पोलीस ठाण्यात दिली असता गुन्हे शाखेकडून यात तपास सुरू करण्यात आला होता.

सोसायटीच्या मीटिंग मध्ये झालेल्या वादातून सूड उगविण्याचा प्रयत्न-

पीडित महिला व तिचा पती राहत असलेल्या इमारतीच्या कार्यकारिणी समितीचे सभासद आहेत. 15 एप्रिल रोजी सोसायटी कमिटीच्या पार पडलेल्या बैठकीत पीडित महिलेचे त्याच इमारतीत राहणाऱ्या अलपेश पारेख (47) या कस्टम ट्रान्सपोर्ट क्लियरिंग च काम करणाऱ्या व्यक्तीशी भांडण झाले होते. हा राग मनात धरून अलपेश याने अश्लील संकेतस्थळावर या महिलेचा वाटस आप फोटो व मोबाईल क्रमांक पोस्ट केल्याचे पोलीस तापासत उघड झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.