ETV Bharat / city

Mamata Banerjee Slammed Modi : छातीचा आकार किती असो, कोणीही अजिंक्‍य नाही - ममता बॅनर्जींचा मोदींवर निशाणा

author img

By

Published : Dec 1, 2021, 8:00 PM IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसीय ( TMC Chief three visit in Mumbai ) मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध ठिकाणी भेटीगाठी घेतल्या आहेत. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे त्यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकार क्षेत्रातील व्यक्तींशी ( Mamata press meet in Mumbai ) खास संवाद साधला. या दरम्यान झालेल्या प्रश्न उत्तरामध्ये त्यांनी देशातील सध्याची परिस्थिती यावर भाष्य करत थेट केंद्रातील मोदी सरकारवर ( Mamata Banerjee Slammed Modi government ) निशाणा साधला आहे.

Mamata Banerjee
ममता बॅनर्जी

मुंबई - नेत्यापेक्षा जनता जास्त ताकदवान असते. कोणीही अजिंक्य नाही. त्यांच्या छातीचा आकार कितीही असो, असा खोचक टोला तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ( Mamata Banerjee Slammed PM Modi ) लगावला आहे. मुंबई दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण केंद्रात माध्यमांशी बोलत होत्या.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसीय ( TMC Chief three visit in Mumbai ) मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध ठिकाणी भेटीगाठी घेतल्या आहेत. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे त्यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकार क्षेत्रातील व्यक्तींशी खास संवाद साधला. या दरम्यान झालेल्या प्रश्न उत्तरामध्ये त्यांनी देशातील सध्याची परिस्थिती यावर भाष्य करत थेट केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कुठलीही गोष्ट अशक्य नाही. फक्त त्यासाठी एकजूट असायला हवी, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा-LPG Cylinder Price Hike : एलपीजी सिलेंडर 100 रुपयांनी महागले

ममता बॅनर्जी ( West Bengal CM on upcoming UP election ) म्हणाल्या, की पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी मोदीजींनी शेतीविषयक कायदे रद्द केले हे सर्वांना माहीत आहेत. ते फार घाबरलेले नाहीत असे समजू नका. तुम्ही अर्धा वेळ परदेशात असाल तर राजकारण कसे करणार? असा सवाल उपस्थित करून त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर भाजपचा पराभव करणे खूप सोपे आहे.

हेही वाचा-अहंकार बाजूला ठेवा.. काँग्रेस हाच पर्याय, काँग्रेसचा ममता बॅनर्जींवर पलटवार

सर्वांनी एकत्र यायला हवे-

विरोधकांच्या एकजुटीबाबत ममता बॅनर्जी यांनी भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, की मी सरकारकडून पगार घेत नाही. मी काय खाणार? सोने, प्लॅटिनम? आजकाल सगळेच डायटिंग करतात. माझ्या १०५ प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधून मिळालेल्या रॉयल्टीतून ( TMC chief Mamata income from books ) माझ्या निवासासाठी निधी दिला जातो. देशातील हुकूमशाही सरकार विरोधात आपण बंड पुकारले आहे. मागील ७ ते ८ वर्षापासून आपण हे सर्व सहन करत आहोत. पण आता ते सहन केले जाणार नाही. आता तशी परिस्थिती राहिली नाही. यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. परंतु या एकत्रीकरणाच्या बाबतीत बोलताना त्यांनी काँग्रेसबद्दल कुठलाही उल्लेख केला नाही.

हेही वाचा-Mamata Pawar Meet : पवारांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जींकडून UPA शिवाय तिसऱ्या आघाडीचे सुतोवाच

पंतप्रधान कोण होणार हे महत्त्वाचे नाही-

तुम्ही महिला म्हणून पंतप्रधान होणार का? यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, की पंतप्रधान कोण होणार किंवा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण आहे, हे महत्त्वाचे नाही. भाजपला पराभूत मुद्दा महत्त्वाचा आहे. राजकारण हा सहिष्णुतेचा विषय आहे. मात्र, मैदानात उतरल्यास भाजपचा पराभव होईल, अशी ताकद हवी आहे. सध्या जिथे भाजप नाही, तिथे पत्रकार सुरक्षित आहेत. त्रिपुरात पत्रकारांना परवानगी नाही. पत्रकार आले आणि मला म्हणाले, दीदी कृपया आम्हाला वाचवा. पत्रकार ही दुसरी महत्त्वाची संस्था आहे. परंतु सध्या माध्यमेही सुरक्षित नाहीत.

भाजप विरोधात एकत्र लढण्यास तयार-

भाजप विरोधात एकत्र लढण्याचा विचार आहे. पण, माझ्या विरोधात निवडणूक लढवली तर मी त्यांच्याशीही राजकीय लढू शकते. प्रत्येक गोष्टीबद्दल बोलू शकत नाही. कारण विरोधक रणनीती बनवतील. परंतु सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षांच्या समान किमान कार्यक्रमासाठी अजेंडा सेट केला जाईल.

उद्योगपती व शेतकरी दोघे हवेत-

देशात उद्योगपती आणि शेतकरी दोघांची गरज आहे. आम्ही दोघांनाही दूर करू शकत नाही. हीच आमची पक्षाची भूमिका आहे. संपूर्ण देशात तिसऱ्या आघाडीची ताकद मजबूत करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

तिसरी आघाडी हवी पण काँग्रेस नको-

भाजप विरोधात सध्या देशात तिसरी आघाडी ( TMC chief Mamata on opposition alliance ) मजबूत होताना दिसत आहे. ही तिसरी आघाडी मजबूत करण्यासाठीच हे प्रयत्न सुरू आहेत. परंतु या तिसऱ्या आघाडी बद्दल बोलताना काँग्रेसला यापासून दूर ठेवण्यावर ममता बॅनर्जी यांचा कल दिसत आहे. काँग्रेस मुक्त भारत करणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे, असेल तर काँग्रेसला सोबत घ्यावच लागणार हा सुद्धा त्यातील एक प्रमुख मुद्दा आहे. परंतु सध्या तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी व काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. या सर्व बाबतीत आता तिसऱ्या आघाडीतील इतर पक्षांसोबत राष्ट्रवादी प्रमुख ज्येष्ठ नेते शरद पवार कशा पद्धतीने तोडगा काढतात हे बघणे सुद्धा गरजेचे झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.