मुंबई - ममता बॅनर्जी यांनी आज शरद पवार (Mamata Banerjee met Sharad Pawar)यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तिसरा आघाडीबाबत चर्चा झाली असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी एक मजबूत तिसरी आघाडी देशाला (Mamata Banerjee on Third Alliance) देण्याची गरज असल्याचे यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका योग्य बजावत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र तिसरी आघाडी ही सर्वांना सोबत घेऊनच होऊ शकते असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी भेट घेतली. (Mamata Banerjee met Sharad Pawar) दुपारी तीनच्या दरम्यान ही भेट झाली असून या बैठकीला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे मंत्री आणि नेत्यांना देखील उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी देशामध्ये तिसरी आघाडी निर्माण करण्यावर महत्त्वाची चर्चा या बैठकीत झाली. मात्र तिसरी आघाडी तयार करताना त्यामध्ये काँग्रेसचा समावेश नसावा असा मुद्दा या बैठकीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी काढला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
ममता बॅनर्जीची काँग्रेसवर उघड नाराजी
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रातून भारतीय जनता पक्षाला सत्ता उत्तर करायचा असेल तर देशातील सर्व प्रादेशिक पक्षाने एकत्र येऊन तिसरी आघाडी तयार करण्याबाबत ममता बॅनर्जी यांनी बैठकीत मुद्दा उपस्थित केला. तसेच विरोधी पक्षात असूनही काँग्रेस आपली भूमिका चोख बजावत नसल्याचं बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी खंत व्यक्त केली. केंद्र सरकारच्या विरोधात लढण्यासाठी एक मजबूत पर्याय उभा करणे गरजेचे आहे. मात्र जे विरोधात आहेत ते केंद्र सरकारची लढायलाच तयार नाहीत असं नाव न घेता काँग्रेसला टोलाही यावेळी ममता बॅनर्जी यांनी लगावला. तसेच देशात मोदींचे सरकार आल्यानंतर फॅसिझम सुरू झाल्या असून त्या विरोधात सर्वांनी उभ राहिलं पाहिजे. यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी तिसरी आघाडी निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच या तिसऱ्या आघाडीचा नेमकं नेतृत्व कोण करणार याबाबत आम्ही पुढे चर्चा करून करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शरद पवार हे देशातले सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर त्यांच्यासोबत चर्चा केली असल्याचेही यावेळी ममता बॅनर्जी यांनी.
सर्वांना सोबत घेऊन निवडणुका लढू -
2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी तिसरी आघाडी तयार करण्याबाबत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee on Third Alliance) यांनी रोखठोक मत मांडले असले तरी सर्वांना सोबत घेतल्याशिवाय तिसरी आघाडी शक्य होऊ शकणार नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडला आहे. आज झालेल्या भेटीत कोणालाही वगळण्याबाबत चर्चा झाली नाही. मात्र सर्वांनी सोबत यायला हवं असं नाव न घेता काँग्रेसलाही शरद पवारांकडून आवाहन करण्यात आले आहे.
'2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी..', तिसऱ्या आघाडीत काँग्रेसच्या समावेशाबाबत ममता बॅनर्जींचे स्पष्ट संकेत - ममता बॅनर्जीकडून तिसऱ्या आघाडीचे संकेत
2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी एक मजबूत तिसरी आघाडी (Mamata Banerjee on Third Alliance) देशाला देण्याची गरज असल्याचे यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका योग्य बजावत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र तिसरी आघाडी ही सर्वांना सोबत घेऊनच होऊ शकते असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले.