मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला Malegaon Bomb Blast Case आज 14 वर्षे पूर्ण झाली असून या प्रकरणातील आरोपींना आणि निर्दोष मृत्यू गेलेल्या लोकांना न्याय मिळाला नाही आहे. यात संदर्भात सर्वांचे लक्ष वेधण्याकरिता मुंबई सत्र न्यायालयातील Bombay Sessions Court विशेष NIA कोर्टामध्ये आरोपी समीर कुलकर्णी यांनी हातावर काळी फीत बांधून या विलंबनाचा निषेध केला आहे.
आरोपी समीर कुलकर्णी यांनी या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लावा याकरिता मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, दिल्लीतील जंतर मंतर, तसेच मुंबईमध्ये देखील अनेक उपोषण केली. सर्वोच्च न्यायालय Supreme Court आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निदर्शनानंतर देखील अद्यापही या खटल्यात ट्रायल संपली नसून निकाल लागला नाही. या प्रकरणांमध्ये सहा लोकांचा मृत्यू तर शंभरहून अधिक व्यक्ती जखमी झाले होते.
आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान आजही साक्षीदार उपस्थित राहिला नाही. त्यामुळे या खटल्याची पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर समीर कुलकर्णी हे न्यायालय परिसरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्या हातावर काळीपट्टी बांधून सर्वांच लक्ष वेधले होते.
या प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी यांनी असे म्हटले की प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षानंतर संपला होता. मात्र आमच्यावर लावलेल्या अन्यायाचा वनवा केव्हा संपणार, हे माहित नाही. या प्रकरणात अद्याप कुठलेही निकाल 14 वर्षे पूर्ण होऊन सुद्धा लागलेला नाही आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात हा निकाल लावावा, हीच अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.
काय घडलं होतं 29 सप्टेंबर 2008 रोजी ? मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी एका मशिदीत बॉम्बस्फोट झाले होते. यात 7 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदीप डांगे यांना अटक झाली होती. एनआयए विशेष कोर्टात सुनावणी सुरु आहे.
काय आहे प्रकरण 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.