मुंबई - देशातील राज्य सरकार आणि महापालिका परिवहन बसला डिझेल दरवाढीतून सूट देण्यात यावी, अशी विनंती करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये होत असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता केंद्र सरकारने घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रति लिटर २५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा सरकारी आणि महानगरपालिका परिवहन सेवांवर आर्थिकदृष्ट्या विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, असे महेश तपासे यांनी निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा - Pramod Sawant as Goa CM : ठरलं! गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी प्रमोद सावंतांच्या नावावर शिक्कामोर्तब