ETV Bharat / city

संकल्प भाजपचा : महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंसह सावरकरांना देणार 'भारतरत्न'

author img

By

Published : Oct 15, 2019, 3:51 PM IST

Updated : Oct 15, 2019, 4:01 PM IST

भाजपने जाहीर केलेल्या संकल्पपत्रात एक महत्वाचे आश्वासन देण्यात आले आहे. या मुद्यावरून पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे. भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे. भाजप आणि शिवसेना दोघांनीही याआधीपासूनच सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी वारंवार केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा हा शेवटचा आठवडा आहे. यात आज (मंगळवार) भाजपने आपले संकल्पपत्र अर्थात जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात वीर सावरकर, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना भारतरत्न देण्यात येणार असल्याचे या संकल्पपत्रात नमून केले आहे. जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचे संकल्प पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार अन् बरंच काही...भाजपचा संकल्पनामा प्रसिद्ध

हेही वाचा - 'राजस्थान, मध्यप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागतील'

दरम्यान, याआधी आघाडी सरकारनेही फुले यांच्या नावावरच राजकारण केले आहे. आता त्याच फुलेंना भाजपने भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा एकप्रकारे ओबीसी समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा भाजप सरकारचा डाव असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दुसरीकडे सावरकर हे भाजपचे आयडॅालच आहेत. त्यामुळे एकाचवेळी दोन्ही बाजूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे याचा भाजपला निवडणुकीत किती फायदा होणार हे पाहणे महत्तवाचे आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीचा जुना पैलवान भाजपच्या तालमीत, माजी आमदार बापू पठारे भाजपात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भविष्यातील महाराष्ट्रातील दिशा नजरेसमोर ठेऊन हा संकल्पपत्र बनवण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी दुष्काळमुक्ती, तरुणांसाठी रोजगार, पायाभूत सुविधा यावर संकल्पपत्रात भर दिला आहे. तळागाळातील लोकांपर्यंत विकास पोहचला पाहिजे, असा संकल्प आमचा आहे. कोकणातील पाणी गोदावरीपर्यंत नेणे, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला देणे. पुरात वाहून जाणारे पाणी हे कॅनलद्वारे दुष्काळी भागात नेण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दुष्काळमुक्त महाराष्ट्र संकल्पना आम्ही मांडली आहे. अर्थव्यवस्थेचा विस्तार करुन उद्योग क्षेत्र, शेती क्षेत्र, सेवाक्षेत्रात रोजगार निर्मीती करणे यावर आम्ही भर दिला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 15, 2019, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.