ETV Bharat / city

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच; उद्या होणार तारीख निश्चित - Maharashtra assembly winter session dates

हिवाळी अधिवेशन यापूर्वी ७ डिसेंबरपासून नागपूर येथे घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यावर संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधानसभा
विधानसभा
author img

By

Published : Dec 2, 2020, 10:30 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचे संकट असताना राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठीची तारीख ३ डिसेंबरला कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित केली जाणार आहे.

हिवाळी अधिवेशन यापूर्वी ७ डिसेंबरपासून नागपूर येथे घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यावर संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी नागपूरला हिवाळी अधिवेशन घेण्यात येत असते.

हेही वाचा-भारती सिंह व तिच्या पतीला मिळालेल्या जामीनविरोधात एनसीबी एनडीपीएस न्यायालयात जाणार

नागपुरात अधिवेशन घेणे सत्ताधाऱ्यांना अडचणींचे-

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे घेतले जाते. परंतु राज्यातील कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता नागपूरमध्ये अधिवेशन घेण्यास सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही असहमती दर्शवली होती. नागपूर येथे अधिवेशन घेतल्यास संपूर्ण सरकारी लवाजमा, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तेथे जावे लागणार आहे. या निमित्ताने विविध मतदारसंघातील आमदारही तेथे येत असल्याने या सर्वांची निवासव्यवस्था करणे अडचणीचे झाले असते. नागपूर येथे अधिवेशन घेतल्यास तेथील संपूर्ण विधान भवन आमदार निवास आणि सरकारी निवासस्थानामध्ये आरोग्यविषयक काळजी घ्यावी लागणार होती. कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. त्यातच उत्तर भारतामध्ये दिल्ली आदी ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट येऊन पोहोचली असतानाच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेणे धोक्याचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा-'शरद पवार इज अ पॉवर'; एकनाथ खडसेंनी उधळली स्तुतीसुमने

दोन ते तीन आठवड्यांचे असणार अधिवेशन

  • सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने अखेर नागपूरऐवजी मुंबईतच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
  • हिवाळी अधिवेशन सरासरी दोन ते तीन आठवड्यांचे असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे अधिवेशन तीन किंवा चार दिवसांचे असेल अशी माहिती सूत्रांनी दिली.
  • काही दिवस हे अधिवेशन ऑनलाईन अथवा दोन्ही सभागृहाचे एकत्र होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, यासाठीचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.