ETV Bharat / city

Weather forecast : कोकणसह मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

राज्यात बळीराजाला सुखावणारी बातमी आहे. पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रासह सर्वत्र चांगला पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Weather forecast
Weather forecast
author img

By

Published : Jul 11, 2021, 4:49 PM IST

Updated : Jul 12, 2021, 1:38 PM IST

मुंबई - काही दिवस पावसाने राज्यात विश्रांती घेतली होती, मात्र आता पुन्हा राज्यात मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने पुन्हा जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रसाठी पुढील पाच दिवसात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नंदूरबार या जिल्ह्यात पावसाचा जोर नसेल असे सांगण्यात आले आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कोकणमधील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात वाऱ्याचा वेगही जास्त असण्याची शक्यता आहे. 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. विजांसह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये किंवा झाडाखाली उभे राहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज मुंबई, ठाणे, पालघरसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात पश्चिम, मध्य आणि उत्तर-पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मुंबईत मान्सून 9 जून रोजी दाखल झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यात हलका पाऊस झाल्यानंतर मान्सूनने विश्रांती घेतली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सक्रिय झालेल्या पावसामुळे नागरिक आनंदी आहेत.

आयएमडीच्या म्हणण्यानुसार, अरबी समुद्रापासून दक्षिण-पश्चिम वारा आणखी वेग घेण्याची शक्यता आहे. 11 जुलैच्या सुमारास बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र होण्याची शक्यता असल्याने पुढील पाच दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस पडेल.

Last Updated : Jul 12, 2021, 1:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.