मुंबई - मान्सूनने महाराष्ट्रात पसरला असून त्याच्या कवेत राज्यातील ( Maharashtra weather forecast ) अनेक जिल्हे आली आहेत. जून महिन्यात अनेक जिल्ह्यात बरसल्यानंतर पावसाने दांडी मारल्याचेही दिसून आले. मात्र जुलै महिन्यात पावसाने काही ठिकाणी ( Maharashtra Rain ) कहर केला. विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. लोकांच्या घरात पाणी शिरले, नदी नाल्यांना पूर आला, पुराने गावांना वेढा घातला. यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यात पुराने हाहाकार घडला. पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले असून जणावरांच्या चाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आज राज्याचे हवामान काय आहे? याबाबत आपण जाणून घेऊया.
-
Saturday, 23/07: येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील पावसाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता. pic.twitter.com/cjIWMwRMdx
">Saturday, 23/07: येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील पावसाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 23, 2022
काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता. pic.twitter.com/cjIWMwRMdxSaturday, 23/07: येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील पावसाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 23, 2022
काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता. pic.twitter.com/cjIWMwRMdx
हेही वाचा - Bit Coin Rate In India : बिट कॉईनच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे बिट कॉईनचे दर
पुणे, मुंबई, ठाणे येथे गेल्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. दिवसा ढगाळ आकाश आणि समान हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने काल ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रावर मध्यम ते दाट स्वरुपाचे ढग असल्याने हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रा मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक जिल्ह्यात पाऊस बरसला आहे.
कुठेकुठे पडणार पाऊस - 25 जुलैला अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, कामगांरांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तर राज्याच्या इतर भागात पाऊस कमी अधिक प्रमाणात पडेल.
राज्यातील प्रमुख शहरांचे जाणून घ्या तापमान -
मुंबई - 27.21 अंश सेल्सिअस
पुणे - 22.8 अंश सेल्सिअस
औरंगाबाद - 28.91 अंश सेल्सिअस
नाशिक - 22.6 अंश सेल्सिअस
नागपूर - 25.2 अंश सेल्सिअस
सोलापूर - 24.8 अंश सेल्सिअस
कोल्हापूर - 23.4 अंश सेल्सिअस
जळगाव - 25.2 अंश सेल्सिअस
वरील तामानाची नोंद आयएमडीकडून सकाळी 8.30 वाजता घेण्यात आली आहे.
हेही वाचा - Petrol Rate Today : किती आहेत तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर, जाणून घ्या