मुंबई - पांढरपेशा समाज आणि शहरवासीयांचे पक्ष, ही ओळख शिवसेना आणि भाजप यांनी कधीच पुसली आहे. मात्र, महाराष्ट्र विधानसभेच्या गुरुवारी आलेल्या निकालातून भाजप सेनेला आजही याच मतदारांच्या कृपेवर अवलंबून रहावे लागत असल्याचे दिसत आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून शिवसेना आणि भाजप यांना संमिश्र प्रतिसाद मिळत असताना, राज्यातील प्रमुख शहरांतील मतदारांनी मात्र या पक्षांना 'प्रामाणिक' साथ दिली. यामुळे विधानसभेच्या निकालाअंती भाजप आणि शिवसेना एकत्र सत्ता स्थापन करू शकण्याच्या मार्गावर आहेत.
राज्यातील एकूण 288 मतदारसंघापैकी 77 मतदारसंघ हे प्रमुख 7 शहरातील आहेत. या महानगरांमध्ये विधानसभेला सर्वाधिक जागा या युतीला म्हणजे शिवसेना भाजप या पक्षांना मिळालेल्या आहेत. राज्याच्या एकूण निकालात युतीलाच सर्वाधिक जागा मिळालेल्याचे चित्र असले, तरी आघाडी आणि युती यांतील फरक हा अवघा 55 ते 60 इतकाच असल्याचे दिसत आहे. म्हणजेच राज्यातील प्रमुख शहरांतील एकूण 77 मतदारसंघापैकी मिलालेल्या 61 जागा याच युतीच्या तारणहार ठरल्याचे पहायला मिळत आहे.
एकुण 77 मतदारसंघ : शिवसेना + भाजप युती - 61
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर (36)
- भाजप - 16, शिवसेना - 14
ठाणे (18)
- भाजप - 08, शिवसेना 05
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड (11)
- भाजप - 08
नाशिक शहर (03)
- भाजप - 03
नागपूर शहर (06)
- भाजप - 04
औरंगाबाद शहर (03)
- भाजप - 01, शिवसेना- 02