ETV Bharat / city

खुशखबर.. महाराष्ट्रातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस मिळणार मोफत - महाराष्ट्र लसीकरण

महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील प्रत्येकाचं मोफत लसीकरण करण्यात येईल. सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल. जागतिक टेंडर मागवण्यात येणार असून, जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे. अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

maharashtra vaccination
maharashtra vaccination
author img

By

Published : Apr 25, 2021, 4:31 PM IST

Updated : Apr 25, 2021, 10:54 PM IST

मुंबई - राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकाचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. टेंडर काढून लसीकरण करण्यात येणार असून सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक

सरकार ग्लोबल टेंडर काढणार -
केंद्र सरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला. केंद्र सरकार या लोकांना लस पुरवठा करणार नाही, हे स्पष्ट आहे. कोविशिल्ड केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खासगींना ६०० रुपये दर असणार आहेत. कोव्हॅक्सिनची किंमतसुध्दा ६०० रुपये राज्यांना व १२०० रुपये खासगींना असेल, असे मलिक यांनी सांगितले. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. सर्वांमध्ये एकमत झाले होते. राज्यातील जनतेला मोफत आणि लवकरात लवकरच लस देण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील सकारात्मक होते. यावेळी कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार आहेत, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

मोफत लस -
१ मे रोजी मुख्यमंत्री मोफत लसीबाबत भूमिका सांगतील. ग्लोबल टेंडर काढू. आदर पुनावाला म्हणाले एवढी लस देऊ शकत नाही. परंतु, आमची क्षमता आहे तेवढी देऊ. मात्र, इतर कंपन्यांच्या लसी सरकार घेणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

Last Updated : Apr 25, 2021, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.