ETV Bharat / city

कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत रविवारी टास्क फोर्सची ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद - Dr Ajit Desai

रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणारी परिषद समाज माध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकीय तज्ज्ञ तसेच नागरिकांना परिषदेला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Sep 1, 2021, 8:43 PM IST

मुंबई - कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्य सरकार अनेकविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार आहेत.

रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणारी परिषद समाज माध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकीय तज्ज्ञ तसेच नागरिकांना परिषदेला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे. या परिषदेतील चर्चेमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शंका तसेच घ्यावयाची काळजी अशा विविध बाबींची माहिती घेता येणार आहे.

हेही वाचा-मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट; 12 आमदारांबाबतचा तिढा सुटला?

आरोग्य मंत्री राजेश टोपे व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. परिषदेत कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ राहूल पंडित, डॉ शशांक जोशी, डॉ. अजित देसाई मुलांसाठीच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ सुहास प्रभू, तसेच अमेरिकेतील डॉ मेहुल मेहता सहभागी होणार आहेत. परिषदेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत. ही परिषद cmomaharashtra यांच्या ट्विटर, फेसबुक व युट्युब https://youtube.com/c/CMOMaharashtra वरुन देखील पाहता येईल. तसेच www.facebook.com/onemdhealth येथे प्रश्न पाठवता येणार आहे.

हेही वाचा-घंटानाद आंदोलन केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

सी.१.२ व्हेरियंटने जगाची वाढविली चिंता-

राज्यात कोरोना, डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरियंटचा संसर्ग झाला आहे. यापेक्षा अधिक गतीने पसरणाऱ्या सी.१.२ व्हेरियंटने जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढवली आहे. हा विषाणू किती गतीने पसरतो याची माहिती नाही. असे असले तरी लसीकरण केलेल्या नागरिकांनाही या व्हेरियंटची लागण होऊ शकते, अशी माहिती राज्य टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.