मुंबई - महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणाचे सहसंचालक अनिल जाधव यांना मंगळवारी (दि.04) रोजी एसीबीने लाच घेताना अटक ( Maharashtra State Vocational Education Joint Director arrested ) केली आहे. त्यानंतर एसीबीने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता कोट्यवधी रुपयांची संपत्ती आढळून आली आहे. 5 लाख रुपयांची लाच घेताना मुंबईतील वांद्रे येथील कार्यालयातून अटक ( Vocational Education Joint Director Arrested ACB ) करण्यात आली आहे.
रंगेहात केले अटक -
एका व्यक्तीने या संदर्भात एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर मंगळवारी ही रक्कम देण्याचं ठरलं आणि जेव्हा अनिल जाधव हे 5 लाखांची लाच घेत होते. त्यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी एसीबी अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. 7 डिसेंबर रोजी संबंधित इसमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अनिल जाधव यांच्या संबंधित तक्रार केली होती. या तक्रारीची एसीबीच्या अधिकाऱ्यांनी खातरजमा केली आणि त्यानंतर मंगळवारी दि. 4 रोजी अनिल जाधव यांना लाच घेताना रंगेहात अटक केले आहे.
1 कोटी 61 लाख 38 हजारांची संपत्ती जप्त -
अनिल जाधव यांना अटक करण्यात आल्यावर त्यांच्या घराची झाडाझडती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी त्यांच्या घरातून सोन्याची नाणे, सोन्याचे बिस्किट आणि इतर दागिने असे एकूण एक किलो 572 ग्रॅम सोने आढळून आले आहे. 1 कोटी 61 लाख 38 हजारांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये 81 लाख रुपयांची रोकडचा समावेश आहे. तर इतर वस्तूंमध्ये सोन्याची नाणी, सोन्याची बिस्किटे आणि दागदागिन्यांचा समावेश आहे.
हेही वाचा - Preparing For Gay Marriage : दोन तरुणींनी केली समलैंगिक लग्नाची तयारी, नागपुरात झाला साक्षगंध