मुंबई - शिंदे-भाजप सरकार स्थापन होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यावरुन शिंदे-भाजप सरकारवर ( Shinde Bjp Government Expanasion ) विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 5 ऑगस्टला होणार असल्याचे ( Maharashtra Cabinet Expanasion ) कळत आहे. राजभवन येथे सायंकाळी सहा वाजता मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, शिंदे गटातील आणि भाजपमधील संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.
शिंदे गट - गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, रामदास कदम, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, सदा सरवणकर.
भाजप - गिरीश महाजन, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, संजय कुटे, रवींद्र चव्हाण, विद्या ठाकूर.
एक दुजे के लिए असल्याची टीका - शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन महिनाभराचा अवधी उलटला. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. विरोधकांनी शिंदे-भाजप सरकारला यावरून घेरले आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्यात उडवलेल्या नैसर्गिक आपत्तीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे लक्ष वेधले. तसेच, मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी केली. राज्याातील जनतेची कामं वेळेवर होत नाहीत. हे सरकार बेकायदेशीर आहे. तसेच, 'एक दुजे के लिए' असाच दोघांचा कार्यक्रम सुरु असल्याची टीकाही होत आहे. त्यात आता मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 5 ऑगस्टल मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंत्रिमंडळ विस्तार रविवारपर्यंत - शिंदे-भाजप सरकारचे भवितव्य न्यायालयात टांगणीला लागले आहे. गुरुवारी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारपर्यंत नक्की होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे मंत्रिमंडळ विचाराबाबत एकमत झाल्याचे समजते.
न्यायालयाच्या निर्देशानंतरच होणार विस्तार? - राज्य मंत्रिमंडळाच्या गेल्या एक महिन्यापासून रखडलेला विस्तार आता शुक्रवारी होण्याची शक्यता मावळली आहे. सोमवारच्या सुनावणी पर्यत विस्तार टाळण्यात यावा, असा सुचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे विस्तार पुढील आठवड्यात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही पक्षातील मिळून 15 आमदार मंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा - शिंदे गट आणि शिवसेनेतील वादावर ८ ऑगस्टला होणार सुनावणी, निवडणूक आयोगाला 'हे' दिले सर्वोच्च निर्देश