ETV Bharat / city

Cabinet Expansion Date : अखेर शिंदे सरकारला मिळाला मुहूर्त; 'या' तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार - शिंदे सरकार मंत्रिमंडळ विस्तार

मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे-भाजप सरकारवर ( Shinde Bjp Government Expanasion ) टीका होत होती. त्यातच आता 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली ( Maharashtra Cabinet Expanasion ) आहे.

shinde fadnavis
shinde fadnavis
author img

By

Published : Aug 3, 2022, 10:09 PM IST

Updated : Aug 3, 2022, 10:55 PM IST

मुंबई - शिंदे-भाजप सरकार स्थापन होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यावरुन शिंदे-भाजप सरकारवर ( Shinde Bjp Government Expanasion ) विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 5 ऑगस्टला होणार ( Maharashtra Cabinet Expanasion ) आहे. राजभवन येथे सायंकाळी सहा वाजता मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एक दुजे के लिए असल्याची टीका - शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन महिनाभराचा अवधी उलटला. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. विरोधकांनी शिंदे-भाजप सरकारला यावरून घेरले आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्यात उडवलेल्या नैसर्गिक आपत्तीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे लक्ष वेधले. तसेच, मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी केली. राज्याातील जनतेची कामं वेळेवर होत नाहीत. हे सरकार बेकायदेशीर आहे. तसेच, 'एक दुजे के लिए' असाच दोघांचा कार्यक्रम सुरु असल्याची टीकाही होत आहे. त्यात आता मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 5 ऑगस्टल मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंत्रिमंडळ विस्तार रविवारपर्यंत - शिंदे-भाजप सरकारचे भवितव्य न्यायालयात टांगणीला लागले आहे. गुरुवारी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारपर्यंत नक्की होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे मंत्रिमंडळ विचाराबाबत एकमत झाल्याचे समजते.

हेही वाचा - Uddhav Thackeray : आतापर्यंत गुलाब पाहिले, आता काटे पाहा; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांसह भाजपला इशारा

Last Updated : Aug 3, 2022, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.