मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे फॉर्म (maharashtra ssc board exam 2022) गुरुवारपासून स्वीकारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचा फॉर्म भरावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (education minister varsha gaikwad) यांनी आज केले.
हेही वाचा - Maharashtra Winter Session 2021 : कोणी म्हणतंय मुंबईत घ्या तर कोणी म्हणतंय नागपुरात, पेच कायम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी (10th exam maharashtra 2022) परीक्षांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेचे फॉर्म गुरुवारपासून स्वीकारले जाणार आहेत. परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने (maharashtra ssc exam forms online) घेण्यात येणार आहेत. यामध्ये माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह गुरूवार 18 नोव्हेंबर ते गुरूवार 9 डिसेंबर 2021 या कालावधीत भरावयाची आहेत.
माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे 10 डिसेंबर ते सोमवार 20 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज 20 डिसेंबर ते मंगळवार 28 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर, माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 18 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2021 असा आहे.
मुदतवाढ दिली जाणार नाही -
माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट 4 जानेवारी 2021 रोजी जमा करावयाची आहे. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
हेही वाचा - Maharashtra Rain : पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता; 13 जिल्ह्यात येलो अलर्ट