मुंबई - एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या ( President Election 2022 ) उमेदवार द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांना बहुमताने निवडून देण्यासाठी भाजप पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरला आहे. त्यातच आता सध्या राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर शिंदे गटाच्या ५० आमदारांच ( Shivsena Rebel MLA Group ) समर्थन भाजपला ( Bjp ) लाभले आहे. त्यामुळे भाजपच्या मत मूल्यात ८७५० ने वाढ होणार आहे. त्याचा मोठा फायदा या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना होणार आहे.
द्रोपदी मुर्मू यांना वाढता पाठिंबा? - १८ जुलैला राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे यूपीए कडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत एकनाथ शिंदे व भाजप यांच्याकडे १६५ आमदार आहेत. तसेच, शिवसेनेच्या काही खासदारांचे समर्थन सुद्धा भाजपला लागणार असल्याने १०,००० पेक्षा अधिक मत मूल्यांचा लाभ भाजपला होणार आहे.
शिवसेनेच्या १२ खासदारांचाही मिळणार पाठिंबा? - आदिवासी समाजातील सक्षम आणि कर्तृत्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे केली यांनी केली आहे. राहुल शेवाळे पाठोपाठ शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी सुद्धा अशा पद्धतीची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर शिवसेनेतील १२ खासदारांचा पाठिंबा भाजपला भेटणार असल्याची ही माहिती समोर आली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारणाला छेद देत महाराष्ट्राची कर्तुत्वान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी यासाठी तेव्हा राष्ट्रपतीपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. तसेच, दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कर्तुत्वाचा आदर करत शिवसेनेने त्यांनाही पाठिंबा दर्शविला होता. म्हणून आता शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देते का? हे पाहणे गरजेचे आहे. त्यात दुसरीकडे शिवसेनेतील १२ खासदारांनी आपला पाठिंबा द्रौपदी मुर्मू यांना देण्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केल्याने त्याचा फायदाही भाजपला होणार आहे.
'असट असेल मतांचे गणित - राज्यातील एका आमदाराच्या मताचे मूल्य हे १७५ तर सरसकट खासदारांच्या मताचे मूल्य हे ७०० आहे. राज्यातील आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५०,४०० असले तरी एक जागा रिक्त असल्याने हे मूल्य ५०,२२५ झाले आहे. विधानसभेत विश्वास दर्शक ठराव आणि अध्यक्षांच्या निवडणुकीत शिंदे गट भाजपला १६४ आमदारांचे समर्थन लाभले होते. महाविकास आघाडीचे संख्याबळ ११० पर्यंत घटले. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपला राज्यातून १६५ पेक्षा अधिक आमदारांचे समर्थन लाभेल असे भाजप नेत्यांचे गणित आहे. शिंदे गटाच्या ५० आमदारांचा पाठिंबा भेटल्यास भाजपच्या मतमूल्यात राज्यात ८७५० ची वाढ होणार आहे. ही निवडणूक जिंकून येण्यासाठी देशातून एकंदरीत ५ लाख ५० हजार च्या आसपास इतके मतमूल्य लागणार आहे.
हेही वाचा - Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार दोन टप्प्यात; 'या' तारखेची प्रतिक्षा