मुंबई - राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग उद्यापासून(15 जुलै) सुरू होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने याबाबत 5 जुलैला शासन निर्णय जारी केला होता. कोरोनामुक्त ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या परिसरातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग 15 जुलैपासून सुरू होणार आहेत.
हेही वाचा - Guidelines for Schools : आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार; वाचा मार्गदर्शक सूचना
सरकारने निर्देशित केलेल्या भागातीलच वर्ग होणार सुरू -
गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे राज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहेत. गेल्यावर्षी दिवाळीनंतर शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या होत्या. प्रथमच शालेय शिक्षण विभागाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग काही अटीशर्ती निश्चित करुन २३ नोव्हेंबर, २०२० पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर १८ जानेवारी, २०२१ रोजीच्या इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारी, २०२१ पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, त्यानंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट टप्प्याटप्प्याने वाढत गेली. त्यामुळे राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. पण आता कोरोना संसर्गाची परिस्थिती राज्यात अनेक ठिकाणी निवळत असल्याने कोरोनामुक्त गावातल्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे.
वाचा मार्गदर्शक सूचना -
- शाळा सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्याने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात येणार आहे. कोरोनासंबंधी नियमांचे पालन करावे लागणार आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आदीचा समावेश आहे.
- सोशल डिस्टन्सिंग पाळल जावे यासाठी एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसता येणार आहे. दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर असायला हवे. एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी बसू शकतील. सतत हात साबणाने धुणे, मास्क घालणे हे नियम पाळवे लागणार आहेत.
- कोरोनासंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
- शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावेत. विविध सत्रात वर्ग भरवावेत.
- एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फुट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे.
- संबंधीत शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
- संबंधित शाळेतील शिक्षकाची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये.
- शाळा सुरू करण्यापूर्वी किंवा शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छताविषयक SOP चे पालन करावे.