मुंबई - शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्याचा शालेय शिक्षण विभागाच्या (School Summer Vacation) निर्णयावरून बराच गदारोळ झाला होता. मात्र, ही चूक सुधारत 2022 ची उन्हाळी सुट्टी 2 मे पासून जाहीर करून नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा 13 जून 2022 पासून सुरू करण्यात यावी, अशी विनंती शिक्षण संचालनालयाने शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.
प्रधान सचिवांकडे विनंती- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. फक्त शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू होत्या. आता कोरोना नियंत्रणात आल्याने शाळा सुरळीत सुरू झाले आहे. मात्र, मुलांच्या अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे यंदा राज्याच्या शाळांतील पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग एप्रिल मध्ये पूर्ण वेळ सुरू ठेवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यभरात पालकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्रही चूक सुधारतो शिक्षण संचालनालयाने 2022 ची उन्हाळी सुट्टीत 2 मे पासून जाहीर करून नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा 13 जून 2022 पासून सुरू करण्यात यावी, अशी विनंती शिक्षण संचालनालयाने शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.
काय म्हटलं प्रस्तावात - संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी 2022 ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालनालयाकडून शालेय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. या प्रस्तावात 2 मे 2022 पासून उन्हाळी सुट्टी लागू करावी ही सुट्टी 12 जून 2022 पर्यंत राहील. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळेत जूनच्या दुसऱ्या सोमवारपासून तर विदर्भामध्ये जूनच्या चौथा सोमवार पासून सुरू करण्यात याव्यात. जूनच्या दुसऱ्या सोमवारी म्हणजेच 13 जून रोजी विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा सुरू होतील तर विदर्भातील जून मधील तापमान विचारात घेता, त्यातील शाळा चौथ्या सोमवारी म्हणजे 27 जून 2022 रोजी सुरू होतील अशा सूचना शिक्षण संचालकांकडून पाठवलेल्या प्रस्तावामध्ये मांडण्यात आलेले आहेत.
काय होता सुरुवातीचा निर्णय? - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. फक्त शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू होत्या. आता कोरोना नियंत्रणात आल्याने शाळा सुरळीत सुरू झाल्या आहेत. मात्र, मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे यंदा राज्यातल्या शाळांतील पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग एप्रिलमध्येही पूर्णवेळ सुरू ठेवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते.
शनिवारी पूर्णवेळ व रविवारी ऐच्छिक - कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून शाळा बंद ठेऊन ऑनलाईन शिक्षण सुरू ( online education in corona crisis ) होते. आता राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून राज्यातील सर्व आस्थापना, कार्यक्रमांवरील कोरोना विषयक निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्यात ( restrictions in pandemic ) येत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी ( reopen Schools in March 2022 ) दिली जाते. या शैक्षणिक वर्षात एप्रिल महिन्यांत इयत्ता पहिली ते नववी व अकरावीची शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहावे लागणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शनिवार पूर्णवेळ व रविवारी ऐच्छिक स्वरुपात मुलांना शाळेत हजर राहावे लागणार आहे.
काय आहे आदेश - एप्रिल महिन्या अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवाव्यात. तसेच रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येईल. इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात व निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा. सकाळच्या सत्रात शाळा घेणे आवश्यक असल्यास अध्यापनाच्या तासिका पूर्णवेळ शाळेप्रमाणे घेण्यात याव्यात. दररोज १०० टक्के विद्यार्थी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येत आहे.