ETV Bharat / city

पुन्हा घंटा वाजणार.. राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून होणार सुरू, मात्र.. शिक्षणमंत्र्यांनी सांगितली नियमावली - राज्यातील शाळा होणार सुरू

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय़ राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आता राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेली आहे. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आंनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

varsha
varsha
author img

By

Published : Sep 24, 2021, 5:14 PM IST

Updated : Sep 24, 2021, 5:36 PM IST

मुंबई - सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करून शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी चे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. शहरी भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होतील. यासाठी टास्क फोर्स आणि राज्य सरकारने मिळून बनवलेली नियमावली सर्व शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना लागू असेल, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शाळा सुरू कराव्या अशी शिक्षण तज्ज्ञांची आणि पालकांचीही मागणी होती. शाळांमध्ये येण्यासाठी पालकांची संमती असणे आवश्यक असणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना अटेडन्सची कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण वर्षा गायकवाड यांनी दिले. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर आमच्या एसओपींमध्ये अजून काही सूचना देण्यात आल्या होत्या, असे गायकवाड यांनी सांगितले. सर्व निवासी शाळा वगळता, नियमित भरणाऱ्या शाळांसाठीच हा निर्णय लागू असेल, असेही गायकवाड म्हणाल्या.

राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे शाळा सुरु करण्यास परवानगी मागितली होती. अनेक दिवसांपासून पालक आणि विद्यार्थ्यांकडून शाळा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर ही मागणी पूर्ण करण्यात झाली असून पुढील महिन्यात शाळेची घंटा वाजणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

वर्षा गायकवाड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, 7 जुलै 2021 रोजी जीआर काढून 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. 10 ऑगस्ट रोजी SOP तयार केली होती. शाळा सुरू होत असल्या तरी शाळांमधील खेळ आम्ही सुरू करत नाही आहोत. शिक्षकांना टास्क फार्सने दिलेल्या सुचनांबाबत ट्रेनिंग दिले जाईल. टास्कफोर्सने दिलेल्या सुचनेचे पालन केले जाणार आहे. विद्यार्थी यांनी कशी काळजी घेतील याबाबत SOP तयार करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा - Schools Reopen : राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार

ग्रामीण भागातील 5 वी पासून तर शहरी भागात 8 वी पासून शाळा सुरू होणार -

वर्षा गायकवाड यांनी सांगितले, की येणाऱ्या काळात 4 ऑक्टोबरला ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी आणि शहरी भागातील 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कोरोनाच्या दोन लसी घ्याव्यात. हे SOP मध्ये आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, सुरक्षेची काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात येईल. विद्यार्थ्यांना घरात आल्यावर कपडे बदलणे, मास्क, याबाबत सूचना दिल्या जातील. पालकांसाठीही सूचना दिल्या जाणार आहेत. मुलांचे टेम्प्रेचर नेहमी तपासले जाईल.

पालकांची सहमती आवश्यक -

ज्या शाळा कोविड सेंटर म्हणून वापरल्या त्याठिकाणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी असेल तर पालकांना, शिक्षक यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येतील. शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी मोहीम चालवणार..शाळेत उपस्थितीबाबत पालकांची सहमती महत्वाची असेल. कोरोना काळात किती विद्यार्थी शाळाबाह्य झाली याची तपासणी सुरू आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या -

शिक्षकांना टास्क फार्स ने दिलेल्या सुचनांबाबत ट्रेनिंग दिले जाईल. टास्कफोर्सने दिलेल्या सुचनेचे पालन केले जाईल. विद्यार्थ्यांनी कशी काळजी घ्यावी, याबाबत SOP तयार करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या काळात 4 ऑक्टोबरला ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी आणि शहरी भागातील 8 वी 12 वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दोन लस घ्यावे, हे एसओपीमध्ये आहे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणा

विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी असेल तर पालकांना, शिक्षकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येतील. शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी मोहीम चालवणार असल्याचे गायकवाड म्हणाल्या. कोरोना काळात किती विद्यार्थी शाळाबाह्य झाली याची तपासणी सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Sep 24, 2021, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.