मुंबई विनायक मेटे यांनी मराठा समाजासाठी आंदोलने केली. सगळ्यात चांगले मार्गदर्शन करायचे. सरकार मेटे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे. मराठा समाजासाठी जी तळमळ होती. शासन नक्की त्यांच्या विचारांसोबत भावनेसोबत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis on Vinayak Mete death म्हणाले, की दिवसाची सुरुवात वाईट पद्धतीने झाली. या प्रकाराची चौकशी व्हावी असे निर्देश दिले आहेत. गरिबीतून वरती आलेला हा नेता होता. माझ्या अतिशय जवळचे सहकारी होते. मराठा समाजाच्या बैठकीसाठी मुंबईत येत होते. त्यांनी मला मेसेज केला होता. कधी न भरून निघणारी हानी आहे. शिवसंग्राम परिवाराला हा मोठा धक्का आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण Ashok Chavhan on Vinayak Mete death माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात मराठा समाजाचे प्रश्न हिरीरीने मांडणारा एक नेता हरपला आहे. विधीमंडळात आम्ही अनेक वर्ष सहकारी होतो. त्यांचे अकाली निधन अविश्वसनीय व वेदनादायी आहे. विनायकराव मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली, काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वाहिली आहे.
चंद्रकात पाटील Chandrakant Patil on Vinayak Mete death शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि आमचे सहकारी विनायक मेटे यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. मराठा आरक्षणासहित मराठा समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी ते आग्रही होते. तळागाळातील मराठा समाजाला न्याय देणारे नेतृत्व आज हरपले. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली असल्याचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी म्हटले आहे.
खासदार अमोल कोल्हे शिवसंग्रामचे नेते व माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याचे दुःखद वृत्त समजले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आई-जगदंबा, मेटे कुटुंबीय व शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना या दुःखातून सावरण्याची ताकद दे, अशी श्रद्धांजली खासदार अमोल कोल्हे यांना वाहिली आहे.
महाराष्ट्र भाजप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे निधन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असे भाजप महाराष्ट्र भाजपने ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
छगन भुजबळ शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे अपघाती निधन झाल्याची दुःखद बातमी ऐकून तीव्र दुःख झाले आहे. विनायक मेटे यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे, अशा शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, अतिशय सामान्य गरीब कुटुंबातून पुढे आलेले विनायक मेटे हे लढवय्या नेते होते. कष्ट करून सामाजिक चळवळीतून ते पुढे आले. शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून विनायक मेटे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी सातत्याने संघर्ष केला. सामाजिक आणि समाजाभिमुख कामांसाठी ते नेहमीच पुढे असायचे. त्यासाठी त्यांनी अनेक चळवळी उभ्या करून अखेरपर्यंत संघर्ष केला. एक संघर्ष करणारा चळवळीतील नेता कायमचा पडद्याआड गेला आहे. मी व माझे कुटुंबीय मेटे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विनायक मेटे यांचा अपघाती निधन अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मला खूप दुःख होत आहे. माझे ते अत्यंत जवळचे मित्र होते. महाराष्ट्रामध्ये विकास कामांमध्ये त्यांनी हिरीरीने भाग घेतलेला आहे. त्यांचे अपघाती निधन महाराष्ट्राचे मोठा नुकसान आहे. आम्ही आपला एक चांगला मित्र गमावला असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. विनायक मेटेंच्या जाण्याने मराठा आरक्षणाचा आवाज हरपल्याची भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते नागपूरात सामूहिक वंदे मातरम गायन आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या निधनान एक संघर्षशील नेतृत्व महाराष्ट्राने गमावले असल्याची शोक संवेदना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत अत्यंत धक्कादायक होते. गेली अनेक वर्षे त्यांच्याशी मित्रत्वाचे एक नाते होते. विविध प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी सदैव आग्रही भूमिका असायची.अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेले ते व्यक्तिमत्व होते. राज्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी सातत्याने वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष केला.सरकार कोणातेही असो ते आपल्या मागण्यांपासून थोडेही दूर गेले नाहीत. प्रश्नांचा पाठपुरावा करणारा नेता हीच त्यांची समाजाच्या सर्व घटकामध्ये ओळख होती. जनसामांन्याशी बाधिलकी मानणारे नेतृत्व या दुर्दैवी घटनेन आपल्यातून हिरावून घेतले आहे आशा शब्दात मंत्री विखे पाटील यांनी विनायक मेटे यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मराठा समाजातील बांधवाना भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झगडणारे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे अकाली अपघाती झालेले निधन मनाला वेदना देणारे आहे, अशी दुःखद भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयास या दुःखद प्रसंगी मनाला धीर देण्याचे बळ देवो, अशा शोकभावना ठाकरे यांनी व्यक्त केल्या. विनायक मेटे यांना गेली अनेक वर्ष जवळून पाहण्याचा योग आला. त्यांचा संघर्ष त्यांच्या समाजासाठी तर असायचाच, पण त्याच सोबत तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची त्यांची भूमिका असायची. भाजप सोबत असताना त्यांची गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत सतत भेट व्हायची. आपला संघर्ष हा मराठा समाजाला एक दिवस न्याय मिळवून देईल याबाबत त्यांना खात्री होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून नेहमी त्यांच्याशी संवाद होत असे. त्यांची तळमळ आणि शोषितांना न्याय देण्याचा आग्रह, धडपड पाहताना नेहमी त्यांचे कौतुक वाटायचे. अधिवेशन काळात विधिमंडळाच्या आवारात होणाऱ्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये त्यांचा आग्रह कायम विधानपरिषदेत मराठा आरक्षणाबाबत विशेष चर्चा घेण्याचा असायचा, उद्धव ठाकरे यांनी मेटे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विनायक मेटे यांच्या अकाली निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
हेही वाचा विनायक मेटे यांच्या वाहनाचा मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात उपचारादरम्यान मृत्यू