मुंबई - बंडखोर शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे ( Shivsena Rebel Mla Eknath Shinde ) यांनी आपल्या गटाचे नाव ठरवले आहे. 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, शिवसेना आणि ठाकरे या दोन नावांचा वापर का करण्यात येतोय काय आहेत? या मागची कारणं जाणून ( Rebel Mla group Use Balasaheb Thackeray Name ) घेऊया.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत आपला वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या गटात शिवसेनेचे बंडखोर आमदार सहभागी असणार आहेत. शिवसेनेचे सुमारे 37 आमदार या बंडखोर गटात असतील, त्यामुळे या गटाचे नाव 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' असे ठेवण्यात आले आहे. पण, हेच नाव का ठेवण्यात आले, याची प्रमुख कारणे जाणून घेऊया.
- एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांची आजवरची वाटचाल आणि प्रवास हा शिवसैनिक शाखाप्रमुख ते मंत्री याच पद्धतीने झाला आहे. त्यामुळे ते स्वतःला अजूनही शिवसैनिक मानतात.
- ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे शेवटपर्यंत शिवसैनिक म्हणून लढले. एकनाथ शिंदे स्वतःला आनंद दिघे यांचे शिष्य मानतात. त्यामुळे ठाण्यात आनंद दिघे आणि शिवसेना हे जसं समीकरण होतं. तसंच ते कायम राहावं आणि एकनाथ शिंदे म्हणजेच ठाण्यातील शिवसेना हे अधोरेखित व्हावं, यासाठी हे नाव घेण्याचा प्रयत्न असावा.
- शिवसैनिक हा नेहमीच पक्षाशी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आणि कट्टर राहिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी शिवसैनिकांच्या मनात अपार श्रद्धा आणि भक्ती आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वेगळे काढता येणार नाही. तसे झाल्यास शिवसैनिक गटापासून फुटू शकतो.
- शिवसेनेतील आमदार किंवा स्वतः एकनाथ शिंदे यांचे अस्तित्व शिवसैनिक म्हणून अधिक आहे. जर त्यांनी बाळासाहेब ठाकरे अथवा शिवसेना हे नाव टाळले, तर त्यांचे समाजातील आणि एकूण राजकारणातील अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नाव टाळता येणार नाही, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केले आहे.
- मुंबईसह राज्यातील दहा मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांना सामोरे जायचे असेल तर नव्या पक्षाचे नाव घेऊन जाणे हे धोक्याचे आहे. नवा पक्ष जनतेते रुजायला आणि त्याला जनतेकडून समर्थन मिळायला निश्चितच वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' हे नाव वापरल्यास मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. हे एक कारण हे नाव घेण्यामागे आहे, असेही ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भारतकुमार राऊत यांचे मत आहे.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेचं बंड, शिवसैनिकांची तोडफोड; मुंबईत 'या' तारखेपर्यंत जमावबंदी लागू