मुंबई - शिवसेना आमदारांच्या बंडाळी मागे भाजपचा हात ( Maharashtra Political Crisis ) आहे. अप्रत्यक्षरीत्या ते मदत करत असून, गुजरात, आसाम आणि गोवा या भाजपशासित राज्यात त्यांना सुरक्षा देत असल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केली आहे. बंडखोर एकनाथ शिंदे ( Rebel Mla Eknath Shinde ) यांच्यासह ३७ आमदारांनी भाजपला साथ द्यावी, अशी मागणी करत आसामच्या गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकला आहे. पक्षादेश झुगारून दिल्याने संबंधित आमदारांवर कारवाईचा निर्णय घेण्याबाबत आज ( 25 जून ) शिवसेनेच्या राष्ट्रीय कोअर कमिटीची बैठक पार पडली. बैठक संपल्यानंतर मनीषा कायदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद ( Manisha Kayande Criticized Bjp ) साधला.
मनीषा कायंदे म्हणाल्या की, बाळासाहेबांचे नाव कोणीही वापरू शकत नाही, असा ठराव करण्यात आला. फुटीर आमदारांवर ती कारवाई केल्यामुळे अद्याप तरी निर्णय घेतला नाही. पण, याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देण्यात आलं. आजच्या बैठकीत एकमताने यावर शिक्कामोर्तब केले.
आसाममध्ये असलेल्या आमदारांना भाजप मदत करते का?, असा प्रश्न विचारला असता कायंदे यांनी म्हटलं की, आमदारांना सध्या गुजरातमधून आसामच्या गुवाहाटी आणि आता गोवा या भाजपशासित राज्यात जात आहेत. चारशे ते पाचशे पोलिसांचे संरक्षण दिले जात आहे. या सर्वांचा अर्थ काय काढायचा?. जनता सुज्ञ आहे. आजवरच्या घडामोडी पाहिल्यास यामागे कोण सूत्रधार आहे, हे स्पष्ट होते, असा निशाणाही त्यांनी साधला आहे.
शिवसेना जोमाने उभी राहिली - आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटले असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्षमपणे लढत आहेत. ते जिद्दी आहेत. लढण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळे शून्यातून शिवसेना जोमाने उभी राहील, असा विश्वास कायंदे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - Rebel MLA Dilip Kesarkar Press : दिपक केसरकरांनी सांगितली शिवसेना आमदारांच्या बंडाची खदखदं, पाहा व्हिडिओ