ETV Bharat / city

Amit Thackeray : अमित ठाकरेंनी केला लोकलमधून प्रवास; मनसेला उभारी देण्यासाठी दौऱ्यावर - Maharashtra Navnirman Vidyarthi Sena

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे ( Amit Thackeray ) सध्या मुंबई जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. पक्षाला नव्या जोमाने आणि ताकदीने उभे करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. तत्पूर्वी त्यांनी मीरा रोड, भाईंदर, वसई, विरार, पालघर, बोईसर समिती परिसराचा दौरा ( Amit Thackeray In Local Train ) केला.

Amit Thackeray
अमित ठाकरे
author img

By

Published : Jul 22, 2022, 7:07 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांचे सुपुत्र अमित ठाकरे ( Amit Thackeray ) सध्या पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी राजकीय दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विद्यमान अध्यक्ष अमित ठाकरे यांनीही आज मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधून ( Local train Mumbai ) प्रवास केला. मीरा रोड, वसई, विरार, पालघर या भागांना भेटी दिल्या. अमित ठाकरे आज अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूरला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. दादर ( Dadar ) ते अंबरनाथ या लोकल ट्रेनच्या प्रवासात त्यांच्यासोबत मनसे कार्यकर्त्यांचाही मोठा जमाव उपस्थित होता. आज त्यांच्या उपस्थितीत अनेक विद्यार्थी नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश करणार ( Amit Thackeray In Local Train ) आहेत.

BMC वर झेंडा कुणाचा? येत्या काही दिवसांत मुंबईतील बीएमसी,( BMC Election 2022 ) जिल्हा पंचायतीसह राज्यातील अनेक नगरपालिकांच्या निवडणुका ( Municipal elections ) आहेत. अशा स्थितीत पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी खुद्द अमित ठाकरे मैदानात उतरले आहेत. राजकीय पक्षांच्या माध्यमातून ते आपल्या पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एका बाजूला माजी पर्यावरण मंत्रीआदित्य ठाकरे देखील पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी 'निष्ठायात्रा' काढत आहेत. तर, दुसरीकडे 'राज'पुत्र अमित ठाकरे देखील दौऱ्यावर आहेत.

हेही वाचा - Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंचं बंड, उद्धव ठाकरे रणांगणांत; शिवसेनेच्या बांधणीसाठी 20 दिवसांत 13 बैठका

अमित ठाकरे सोडवणार विद्यार्थ्यांच्या समस्या - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या मुंबई जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पक्षाला नव्या जोमाने आणि ताकदीने उभे करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. तत्पूर्वी त्यांनी मीरा रोड, भाईंदर, वसई, विरार, पालघर, बोईसर समिती परिसराचा दौरा केला. त्यानंतर आज ते अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूरच्या दौऱ्यावर विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना करणार आहेत. या आधीचे त्यांचे दौरे पाहिले असता त्यांना विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो.

अमित ठाकरे लोकलमध्ये - मुंबईच्या लोकलला मायानगरीची लाईफ लाईनही म्हणतात. अनेकदा अनेक मातब्बर नेते मंत्री लोकल ट्रेनने प्रवास करतात. निवडणुका जवळ आल्या की मुंबईच्या राजकारणातील अनेक नेते लोकल ट्रेनने प्रवास करताना आतापर्यंत मुंबईकरांनी पाहिलं आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही अंबरनाथला जाण्यासाठी लोकल ट्रेनची मदत घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विद्यार्थीदल मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अमित ठाकरे यांचे अंबरनाथमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.

हेही वाचा - Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर बरसले; म्हणाले, 'गद्दार नजरेला नजर मिळवू...'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.