मुंबई विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ बघायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र बघायला मिळालं. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी- विरोधक आमनेसामने आले आहेत.Maharashtra Monsoon Session 2022 आज विरोधकांची विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्याची जागा सत्ताधारी आमदारांनी काबीज केली आहे.
ठाकरे व पवारांवर टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Former Chief Minister Uddhav Thackeray तसेच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर या आमदारांनी घोषणाबाजी करत निशाणा साधला आहे. कालच शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली होती. शिंदे गटाच्या 50 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता सातत्याने आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्यावर टीका होत आहे. या टीकेला आज शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपच्या आमदारांसोबत विधान भवनाच्या पायऱ्यांवर बॅनरबाजी करून उत्तर दिले. याप्रसंगी विविध प्रकारचे बॅनर झलकविण्यात आले होते.
उध्दव ठाकरेंवर टीका कोविडच्या भीतीने राजा बसला घरी, हवालदिल जनता फिरली दारोदारी, युवराजांच्या चेल्यानी लुटली तिजोरी, भ्रष्टाचाराचे खोके पोहचले यांच्या घरी, अशी उध्दव ठाकरेंवर टीका विरोधक करत आहेत. आता फिरतात दारोदार पक्ष टिकवण्यासाठी लढणारे गद्दार, पक्ष संपवणार यांच्यासाठी मोठे खुद्दार, खुर्चीसाठी केले हिंदुत्व हद्दपार, खुर्चीत बसल्यावर शिवसैनिक केले वेशीपर, खुर्ची गेल्यावर आता फिरतात दारोदार अशा पद्धतीचे बॅनर झळकावून व नारेबाजी करत थेटपणे आता शिंदे गटाच्या आमदारांनी भाजप आमदारांना सोबत शिवसेना व राष्ट्रवादीशी दोन हात करण्याचाच इशारा दिला आहे. भ्रष्टाचाराचे खोके, मातोश्री ओके अनिल देशमुख खोके सिल्व्हर ओक ओके, लावसाचे खोके सिल्व्हर ओक ओके, बेस्टचे खोके मातोश्री ओके, अशा पद्धतीच्या घोषणाबाजी ही याप्रसंगी करण्यात आले आहे.
हेही वाचा Bilkis Bano Case बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींचे स्वागत करणे अयोग्य, देवेंद्र फडणवीस