ETV Bharat / city

Maharashtra Live Breaking News; एकतर्फी प्रेमातून युवतीची महाविद्यालया जवळच हत्या - महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज २१ मे २०२२

Maharashtra Live Breaking News_21 May 2022

author img

By

Published : May 21, 2022, 7:01 AM IST

Updated : May 21, 2022, 5:20 PM IST

17:14 May 21

एकतर्फी प्रेमातून युवतीची महाविद्यालया जवळच हत्या

भरदिवसा महाविद्यालयजवळच तरुणीला ओढत नेत तीची भोसकून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वेदांतनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

15:37 May 21

सहावी जागा लढणारच शिवसेना अटीवर ठाम

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने दावा केल्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून संभाजी राजे भोसले रिंगणात उतरले आहेत. राजे बिनविरोध राज्यसभेवर जाण्यासाठी मराठा संघटनांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र शिवसेना आपल्या अटींवर ठाम असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

12:28 May 21

मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी संजय राऊत यांच्या भेटीला

संजय राऊत
संजय राऊत

मुंबई - मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी संजय राऊत यांच्या भेटीला गेले. संभाजीराजांना राज्यसभेसाठी पाठिंबा देण्यासंदर्भात त्यांनी राऊत यांची भेट घेतली. संभाजी राजेंकडे निवडून येण्याइतकं मताधिक्य असेल म्हणून ते अपक्ष लढण्यावर ठाम असावेत. असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या पाठिंब्यावर शिवसेना दुसरी जागा लढणार असल्याचेही सूतोवाच केले होते. त्यामुळे मराठा समाज संघटनांच्या प्रतिनिधीनी भेट घेतल्याचे समजते. दरम्यान या भेटीनंतर संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत.

12:24 May 21

लाल महाल लावणी प्रकरणी नृत्यांगणा वैष्णवी पाटीलसह इतरांवर गुन्हा दाखल

  • Maha | Pune Police registered FIR against dancer Vaishnavi Patil & 2 others & booked u/s 295, 186 IPC at Faraaskhana PS for shooting Lavani inside Pune's Lal Mahal

    Chhatrapati Shivaji Maharaj spent his childhood at Lal Mahal & it holds a historical value

    (Pic:Patil's Instagram) pic.twitter.com/sSPic6opNO

    — ANI (@ANI) May 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुणे - लाल महाल येथे मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे शूट केलं होतं. यानंतर ती रिल्स ( Lal Mahal Lavani Reels ) समाजमाध्यमांवर टाकण्यात आली होती. यानंतर सर्वत्र टिका होऊ लागली आणि आज पोलिसांनी तीन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

11:49 May 21

बीएमसीची नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आणखी एक नोटीस

  • BMC issues another notice to Amravati MP Navneet Rana and MLA Ravi Rana regarding illegal construction in their house located in the Khar area of Mumbai: Brihanmumbai Municipal Corporation (BMC)

मुंबई - खार भागात असलेल्या घरातील बेकायदा बांधकामाबाबत बीएमसीने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आणखी एक नोटीस बजावली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ही माहिती दिली आहे.

11:07 May 21

लाल महाल लावणी प्रकरणी वैष्णवी पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल, आव्हाडांची तिखट प्रतिक्रिया

  • पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल हि वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे ...ह्यापुढे होता कामा नाही.. कोणी केले असेल तर वापरू नका @PuneCityPolice

    — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई - पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे. ह्यापुढे असे होता कामा नये. कोणी तसे केले असेल तर ते वापरू नका अशा आशयाचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. दरम्यान, पुण्यातील लाल महाल येथे एक महिन्यांपूर्वी सादर करण्यात आलेल्या लावणी प्रकरणी नृत्य करणाऱ्या वैष्णवी पाटलासह तिघांवर फरासखाना पोलीस स्टेशन येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10:43 May 21

भाजपने देशभर रॉकेल फवारले, एका ठिणगीने संकट ओढवू शकते - राहुल गांधी

लंडन - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका मुलाखतीत भाजपवर सडकून टीका केली आहे. भारताची स्थिती चांगली नाही. भाजपने देशभर रॉकेल फवारले आहे. एक ठिणगी पडली की मोठ्या संकटात पडू. लोक, समुदाय, राज्ये आणि धर्म यांना एकत्र आणणाऱ्या विरोधी पक्षांची, काँग्रेसचीही ही जबाबदारी आहे असे मला वाटते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

09:59 May 21

पर्ल्स ग्रुपवर ईडीची मोठी कारवाई

पर्ल्स ग्रुपवर ईडीची मोठी कारवाई
पर्ल्स ग्रुपवर ईडीची मोठी कारवाई

मुंबई - पर्ल्स ग्रुपवर ईडीने मोठी कारवाई केल्याची माहिती आहे. वसई, पुण्यातील 75 एकर जमीन जप्त करण्यात आलीय. 7.5 कोटी रुपयांची बँकेतील रक्कमसुद्धा जप्त केली आहे. 60 हजार कोटी चिटफंड घोटाळ्यातील चौकशीनंतर ही कारवाई केली आहे. PMLA कायद्याअंतर्गत पर्ल्स ग्रुपवर ईडनेही कारवाई केली आहे.

09:03 May 21

मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ

मुंबई - डी कंपनीच्या सदस्यांची मदत घेतल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने निरीक्षण मांडले आहे. मंत्री नवाब मलिक हे कुर्ला स्थित गोवावाला कंपाउंड जमीन प्रकरणात जाणून बुजून मनी लाँडरिंग आणि गुन्हेगारी कट कारस्थानमध्ये सामिल होते ही बाब समोर आल्याचे कोर्टाने म्हटले आहे. मलिक यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयात दाखल आरोप पत्राची नोंद घेऊन कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले आहे. कोर्टाने या प्रकरणात मलिक आणि सरदार सहावली खान विरोधात कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

08:14 May 21

राजीव गांधींना सोनिया आणि राहुल गांधींसह प्रियंका गांधींची आदरांजली

  • Congress interim president Sonia Gandhi and Priyanka Gandhi pay homage to former Prime Minister Rajiv Gandhi on his 31st death anniversary at Vir Bhumi in Delhi. pic.twitter.com/3NVwviAQAr

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना त्यांच्या 31 व्या पुण्यतिथीनिमित्त दिल्लीतील वीर भूमी येथे श्रद्धांजली वाहिली. पी. चिदंबरम आणि इतर काँग्रेस नेत्यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

07:33 May 21

शरद पवारांची आज ब्राह्मण समाजाबरोबर बैठक

पुणे - ब्राह्मण समाज शरद पवार यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज ब्राह्मण समाजातील विविध संस्थाना बैठकीला बोलावले आहे. गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच ब्राह्मण समाजातील संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी अशाप्रकारे शरद पवार बैठक घेत आहेत. त्यामुळे उत्सुता निर्माण झाली आहे.

06:53 May 21

Maharashtra Live Breaking News_21 May 2022; भीषण अपघात, ७ जण जागीच ठार

धारवाड : धारवाड तालुक्यातील बडवा गावात काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास झाडावर गाडीने धडक देऊन भीषण अपघात झाला. यात सात जण जागीच ठार झाले. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून लग्न आटोपून परत येताना हा अपघात झाल्याचे कळते. मनसुरा गावातून बेनक्कनीकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. अद्वितीय (14), हरीश (13), शिल्पा (34), नीलवचा (60), मधुश्री (20), महेश्वरय्या (11) आणि शंभुलिंगम (35) अशी मृतांची नावे आहेत. जखमींना हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धारवाड ग्रामीण स्थानकात ही घटना घडली.

Last Updated : May 21, 2022, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.