मुंबई - पावसाच्या काहीशा विश्रांतीनंतर परत एकदा पावसाने संपूर्ण राज्यभरात धुमशान घातले आहे. हवामान विभागाने ( India Meteorological Department, IMD ) पुढच्या ३ दिवसांसाठी देशातील विविध राज्याकरिता पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार की, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश (Flood) परिस्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच हवामान विभागाने नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुढील 48 तासांत अधिक तीव्र होणार असल्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यांसोबतच मुंबईसाठीही ३ दिवसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. दरम्यान, सध्या कोकणात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. विविध ठिकाणी पावसामुले जनजीव मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गुहागर तालुक्यात मोठा पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.
-
📢 7 August.🌧☔
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
IMD ने महाराष्ट्रासाठी 5 दिवसांच्या तीव्र हवामानाच्या चेतावणी दिल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सून जोरदार (vigorous) होण्याची शक्यता.
कृपया दररोज अद्यतने तपासा.
काही ठिकाणी पुरजनक परिस्थितीची शक्यता. नदीकाठच्यांनी सावध प्लीज
काळजी घ्या pic.twitter.com/taJzTRifaj
">📢 7 August.🌧☔
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 7, 2022
IMD ने महाराष्ट्रासाठी 5 दिवसांच्या तीव्र हवामानाच्या चेतावणी दिल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सून जोरदार (vigorous) होण्याची शक्यता.
कृपया दररोज अद्यतने तपासा.
काही ठिकाणी पुरजनक परिस्थितीची शक्यता. नदीकाठच्यांनी सावध प्लीज
काळजी घ्या pic.twitter.com/taJzTRifaj📢 7 August.🌧☔
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 7, 2022
IMD ने महाराष्ट्रासाठी 5 दिवसांच्या तीव्र हवामानाच्या चेतावणी दिल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सून जोरदार (vigorous) होण्याची शक्यता.
कृपया दररोज अद्यतने तपासा.
काही ठिकाणी पुरजनक परिस्थितीची शक्यता. नदीकाठच्यांनी सावध प्लीज
काळजी घ्या pic.twitter.com/taJzTRifaj
दरम्यान, सध्या राज्यात विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. विशेषत: म्हणजे मराठवाड्यात औरंगाबाद, लातूर, नांदेड यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मुंबईत पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यामधील घाटंजी तालुक्यातील पारवा आणि साखरा या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा - विदर्भात पुढील ३ दिवसांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भाकरिता यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात 9 आणि 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मान्सूनची सक्रियता वाढल्यानं पाऊस मोठ्या प्रमाणात - मान्सून देशाच्या बहुतांश भागात सक्रिय झाला आहे. त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेस स्थित आहे. याबरोबरच उत्तर- पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. तसेच पूर्व- मध्य आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्राच्या मध्यभागी समुद्रसपाटीपासून 3.1 किमी आणि 5.8 किमी दरम्यान Cyclonic Circulation आहे. म्हणूनच या हवामान हालचालींमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकणार आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा - Sanjay Raut ED Custody : संजय राऊतांची ईडी कोठडी आज संपणार जामीन मिळणार? आज पुन्हा कोर्टात सुनावणी