ETV Bharat / city

MVA Govt In SC : राज्यपालांच्या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात, 5 वाजता सुनावणी

भाजपच्या मागणीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( governor bhagat singh koshyari ) यांनी महाविकास आघाडी सरकारला उद्याच विश्वासदर्शक चाचणीला ( MVA Government Floor Test ) सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. याविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली ( MVA Govt In SC ) आहे. संध्याकाळी 5 वाजता या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Koshyari Thackeray
कोश्यारी ठाकरे
author img

By

Published : Jun 29, 2022, 10:50 AM IST

Updated : Jun 29, 2022, 11:05 AM IST

मुंबई : भाजपच्या मागणीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( governor bhagat singh koshyari ) यांनी महाविकास आघाडी सरकारला उद्याच विश्वासदर्शक चाचणीला ( MVA Government Floor Test ) सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. याविरोधात महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली ( MVA Govt In SC ) आहे. संध्याकाळी 5 वाजता याचिकेवर सुनावणी होणार आहे.

  • Maharashtra govt will have to move Supreme Court against Governor B S Koshyari's letter mandating Uddhav Thackeray-led dispensation to face floor test on Thursday: Congress veteran Prithviraj Chavan

    — Press Trust of India (@PTI_News) June 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

याबाबत बोलताना काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण ( Congress Leader Prithviraj Chavan ) म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार उद्याच विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. मात्र याविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

  • Supreme Court agrees to hear at 5 pm plea of Shiv Sena chief whip Sunil Prabhu challenging Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari's direction to Chief Minister Uddhav Thackeray to prove his majority support on the floor of the House on June 30.#MaharashtraPolitcalCrisis pic.twitter.com/3PqhbmDWZ2

    — ANI (@ANI) June 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधिमंडळ सचिवांना गुरुवारी सकाळी ११ वाजता शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारची चाचणी घेण्यास सांगितले आहे. पीटीआयशी बोलताना चव्हाण म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलैपर्यंत या प्रकरणावर स्थिती कायम ठेवली आहे. त्यानुसार राज्य विधानसभेच्या उपसभापतींसमोर अपात्रतेची कार्यवाही 11 जुलैपर्यंत स्थगित ठेवण्याच्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत होते.

"विश्वासदर्शक चाचणीसाठी राज्यपालांच्या पत्राविरोधात महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. उपसभापती (विधानसभा) यांना शिवसेना विधीमंडळ पक्षातील फूट ओळखावी लागेल. बंडखोर आमदारांना पत्र द्यावे लागेल की ते त्यांना विधिमंडळ पक्षाच्या दोन तृतीयांश लोकांचा पाठिंबा आहे आणि ते दुसर्‍या पक्षात विलीन झाले आहेत,” ते म्हणाले. एमव्हीए सरकारने आणलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात बंडखोरांनी मतदान केले तर ते अपात्र ठरतील, असे चव्हाण म्हणाले.

दरम्यान, राज्यपालांच्या पत्रामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी एमव्हीए नेत्यांची बैठक बोलावली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सांगितले की, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारच्या विरोधात फ्लोर टेस्टसाठी ते गुरुवारी मुंबईत येणार आहेत.

हेही वाचा : Rebel Shivsena Leader Eknath Shinde : उद्या मुंबईत येऊन बहुमत सिद्ध करणार-एकनाथ शिंदे

Last Updated : Jun 29, 2022, 11:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.